TIMES OFF AHMEDNAGAR
अहमदनगरधील लोकसभेच्या प्रचाराचा धुराळा आता क्लायमॅक्सकडे चालला आहे. निलेश लंके व खासदार विखे यांच्या प्रचारार्थ दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. आता अवघे दोनच दिवस प्रचाराला उरले असल्याने सभांचा धुराळा उडाला आहे.आता उपमुख्यमंत्री अजित पवार खा. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अहमदनगरच्या आखाड्यात उतरलेत. त्यांनी आज कर्जतमध्ये सकाळी सभा घेतली. या सभेतून त्यांनी आ. रोहित पवार व उमेदवार निलेश लंके यांच्यावर मोठा घणाघात केला. तसेच त्यांनी यावेळी विकासाचे आगामी प्लॅनिंगही सांगितले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया.
उठावं अन मला खासदार व्हायचंय म्हणावं
अजित पवार यांनी निलेश लंके यांच्या टीकास्त्र सोडताना म्हणाले की, ते आमदार असताना मी अर्थमंत्री होतो. त्यांना साडेचार वर्षांत मी निधी दिलेला आहे. त्यामुळे जो विकास दिसतोय त्यामागे मी आहे. कोणतेही काम करताना अनुभव असला पाहिजे पाच दहा वर्षे आमदारकीचे काम करावे. त्यानंतर मग खासदारकीची स्वप्न पाहावेत. तेथे कसे बोलावे, कसे उठावे, कसे काम करावे लागते याचा अनुभव पाहिजे. की उठावं अन मला खासदार व्हायचंय म्हणावं, असं चालत नाही असे म्हणत अजित पवारांनी निलेश लंकेंवर टीकास्त्र सोडले आहे.तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, विजय औटी, दोनशे तरुणांनी माझ्याकडे येत निलेशचे वास्तव सांगितले. ते म्हणले की मी यांना जवळून अनुभवले आहे.यांचा काहीही उपयोग नाही ते म्हणाल्याचे पवार म्हणाले. तसेच मी त्यांना नाही म्हणून सांगितले होते. पण कुणीतरी डोक्यात हवा घातली असेही पवार म्हणाले.
स्त्रोत सोशल मिडिया.
मंदिरात घंटा वाजावी लागली असती
रोहित पवार यांच्यावर देखील अजित पवार यांनी टीका केली आहे. हा राज्याचा नेता बनायला चाललाय. पण याच्या मागे कुणीच नाही. पदयात्रा काढली त्यावेळी जयंत पाटील, सुप्रिया सुळे देखील त्यांच्यासोबत नव्हत्या.रोहित म्हणत असेल की मी विकासकामे केली पण त्यांना निधी देताना मी अर्थमंत्री होतो. आपली माणसे म्हणून मी निधी दिला नाहीतर त्याला मंदिरात घंटा वाजावी लागली असती असे ते म्हणाले. तसेच जवळपास अडीच वर्षे सत्तेत होतात तर मग एमआयडीसी त्यावेळी का झाली नाही याचेही उत्तर जनतेला द्यावे असे ते म्हणाले.