युवासेना सहसचिव विक्रम राठोड यांनी कुटुंबासमवेत केले मतदान. म्हणाले तुतारी वाजणार ……
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | LOK SABHA ELECTION | SOUTH LOK SABHA CONSTITUENCY | YUVA SENA JOINT SECRETARY VIKRAM RATHORE ALSO VOTED | SASIKALA RATHORE | TEJASWINI VIKRAM RATHOD | VINAYA ANIL RATHORE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
दक्षिण लोकसभा मतदार संघात एकूण २५ उमेदवार रिंगणात होते. मात्र लक्ष वेधले होते ते महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या उमेदवारीने. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , राष्ट्रीय कॉंग्रेस या सर्व पक्षाच्या उमेदवारांनी कंबर कसली होती. मात्र या पक्षांच्या कार्यकर्त्यांसह माजी.आमदार स्व.अनिल राठोड यांच्या चाहत्यांनी देखील लंकेंच्या प्रचारासाठी मैदानात उडी घेतली होती. दक्षिण लोकसभा मतदार संघात आज १३ मे रोजी मतदान झाले.
स्व.अनिल राठोड (स्त्रोत.सोशल मिडिया)
माजी.आमदार स्व.अनिल राठोड यांचे सैनिक लंकेंच्या समर्थनात.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन प्रचारसभांमध्ये हजेरी लावलीच, मात्र विक्रम राठोड यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे हे रिंगणात होते. त्यावेळी विखेंच्या मदतीला स्व.अनिल राठोड हे धावून आले होते. मात्र विखेंनी स्व.राठोड यांच्याशी गद्दारी केल्याचा ठपका स्व.राठोड यांच्या चाहत्यांनी विखेंवर लावला होता. विखेंनी आमच्या भैय्यांना पाडले म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विखेंचा पराभव करणे हेच आमचे ध्येय असल्याचे स्व.राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा स्पष्ट केले होते. विक्रम राठोड यांनीदेखील कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले होती. विक्रम राठोड हे आपल्या कार्यकर्त्यानसोबत लंकेंच्या प्रचारात सक्रीय होते.
युवसेना सहसचिव विक्रम राठोड यांनी कुटुंबासह मतदान केले.
तुतारी वाजणार विक्रम राठोड यांनी व्यक्त केला विश्वास.
आज १३ मे रोजी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले. यावेळी युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांनी सहकुटुंबासह गांधी मैदान येथील मार्कंडेय विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी स्व.अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला अनिल राठोड , तेजस्विनी विक्रम राठोड , विनया अनिल राठोड यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे विजयी होतील असा विश्वास युवासेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांनी व्यक्त केला आहे. अहमदनगरमध्ये 53.27% टक्के मतदान झाले.