महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती मतदान ? पहा प्रत्येक जिल्ह्यातील मतदार संघाची आकडेवारी.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | LOK SABHA CONSTITUENCY | NUMBER OF CONSTITUENCIES IN EACH DISTRICT OF THE STATE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पडणार असून आज १३ मे रोजी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात ११ मतदारसंघात निवडणुका पार पडत आहेत. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ मतदारसंघात आज नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ९६ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील सर्व २५ तेलंगणातील सर्व १७ उत्तर प्रदेशातील १३ आणि महाराष्ट्रातील ११ जागांचा समावेश आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
राज्यात एकूण झालेले मतदान
राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५२ .४९ टक्के मतदान झालेले आहे. सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये तर शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे.