TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | FAKIRWADA | FOR THE DEMAND FOR REPAIRING THE DRAINAGE LINE AT GAURAVNAGAR FAKIRWADA APPLICATION TO MUNICIPAL COMMISSIONER | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन. गौरवनगर फकीरवाडा येथील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनि मनपा आयुक्तांकडे धाव घेतली आहे. ड्रेनेजचे मैलमिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- वार्ड क्रमांक ४ मधील गौरवनगर फकीरवाडा येथील मोठी ड्रेनेज लाईन गेलेली आहे. ती ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत आहे व तुंबल्या नंतर त्यातील मैलमिश्रित पाणी सर्व रस्त्यावरून नागरिकांच्या दारातून वाहत आहेत या वार्डच्या विभागीय कार्यालयात वारंवार तक्रारी केल्या आहे. परंतु तक्रार केल्यानंतर सफाई कामगार तात्पुरती पट्टी टाकून पाण्याला वाट करून देतात आणि परत पुढील ६ ते ७ दिवसात पुन्हा ड्रेनेज लाईन पॅक होते. पुन्हा मैलमिश्रित पाणी नागरिकांच्या दारातून वाहते त्यामुळे येथे समपूर्ण दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून घरातील लहान मुले वृद्ध सतत आजारी पडत असल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने गौरवनगर फकीरवाडा येथील ड्रेनेज लाईनचे काम त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन देताना छावा संघटनेच्या महिला जिल्हाअध्यक्ष सुरेखाताई सांगळे समवेत गिरीश मुळे, पूनम शेलार, नागनाथ कासार, सोनाली शेलार, सना शेख, राम चिंचोळी, नईम सय्यद, संगीता केरूळकर, सोनाली मुनोत, प्रदीप कारर्ड, मझहर अली, सुनिता साळी, रिजवान पठाण, शोभा घाडगे, पुष्पा शिंदे आदीसह प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.