Reading:मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही,
मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही,
TIMES OF AHMEDNAGAR | UTTAR PRADESH | VARANASI | HOME MINISTER DEVENDRA FADNAVIS | MLA JITENDRA AWHAD | RAHUL GANDHI | SHIV SENA DEPUTY LEADER SUSHMA ANDHARE | NATIONALIST LEADER CHHAGAN BHUJBAL | COMMENTARY OF FADNAVIS ON MANUSMRITI AND JITENDRA AWHAD'S MOVEMENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट केले जातील असा आरोप करुन महाड या ठिकाणी जितेंद्र आव्हाड महाडच्या चवदार तळ्यावर आंदोलन केले आहे. मनुस्मृती फाडताना त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला होता. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाजपाने या कृतीविरोधात राज्यभरात आंदोलन केले आहे. या सगळ्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस वाराणसी दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशातल्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचारासाठी ते पोहचले आहेत. काशी या ठिकाणी काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील पुणे अपघात आणि मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही भाष्य केले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मी काशीत प्रचाराला आलेलो नाही मी लोकांचचे प्रेम पाहण्यास आलो आहे असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका….
राहुल गांधी म्हणतात की ४ जूनला मोदी सरकार घरी जाणार आणि इंडिया आघाडीचे सरकार येणार , याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी लहान असताना मुंगेरीलाल के हसीन सपने ही सीरियल लागायची. त्यात दाखवल्याप्रमाणे राहुल गांधींना स्वप्न पाहु द्या. ते भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील अशी स्वप्नं त्यांना पडत असतील. लोकांनी मोदींना निवडले आहे हे आम्ही पाहत आहोत. मनुस्मृतीतला एकही श्लोक कुठल्याही अभ्यासक्रमात घेण्याचा विचारही महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आलेला नाही. आजच नाही कधीही आलेला नाही. त्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. आमचे विरोधक रोज खोटे बोलतात आणि त्यासाठी मुद्दा शोधून काढतात. ज्यांनी चर्चा सुरु केली त्यांनीच आंदोलन सुरु केले. ते आंदोलन कसे खोटे होत हे आपण पाहिले आहे. आंदोलन करताना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाडांनी फाडला आहे. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
जितेंद्र आव्हाड यांनी मागितली माफी.
जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनादरम्यान जी कृती केली त्यावरुन भाजपा आक्रमक झाली आहे. राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात जितेंद्र आव्हाडांचा फोटो फाडला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आव्हाड यांची बाजू मांडली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही देखील आव्हाड यांची पाठराखण केली. तर, जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेबाबत माफी मागितली आहे. काल अनावधानाने झालेल्या प्रसंगा बद्दल मी लगेच जाहीर माफी मागितली. असे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.