मुंबई विमानतळावर ग्राऊंड हॅण्डलिंगचे काम करणाऱ्या तुर्कीएच्या ‘सेलेबी’ कंपनीचा सुरक्षा परवाना रद्द करण्यात आल्यानंतर ३७०० कामगारांची नोकरी धोक्यात आली. मात्र भारतीय कामगार सेनेने यावर लढा दिल्याने या कामगारांना सेलेबीच्या जागी येणाऱ्या इंडो-थाई कंपनीमध्ये त्याच पगारावर सामावून घेण्यात आलं आहे. यानंतर कामगार उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी कामगारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. तसंच उद्या जर कोणाच्या मनात आपले लचके तोडण्याचा विचार आला तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ते आपण एकत्र मिळवून ठरवू असा इशाराही दिला. मातोश्रीवर कामगारांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी काहीतरी पराक्रम केला असं तुम्हाला वाटत असेल. पण पराक्रम मी केलेला नाही तर सर्वांच्या एकजुटीने केला आहे. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे नावाने हे केलं आहे. शिवसेनेची स्थापना भूमिपूत्रांवर अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर त्याला तोडून मोडून टाकणं होतं.
(संग्रहित दृश्य.)
ह्रदयाातून भावना यायला हवी.
घार हिंडते आकाशी, लक्ष तिचं पिल्लापाशी असं अरविंद सावंत म्हणाले. पण एक गंमत पाहिलं तर तुम्ही ग्राऊंड स्टाफ आहात म्हणून या विमानाच्या घारी आकाशात उडतात. पुढे ते म्हणाले, आकाशात गिधाडंही असतात. मला आपल्या सोबत असणाऱ्यांची गिधांडांपासून चिंता असते. एकदा एकजूट तुटली तर लचके तोडण्यास शत्रू मोकळे असतात. ज्या क्षणी बातमी वाचली तेव्हाच अरविंद सावंत यांना फोन केला. अरविंद यांनी संजय तिथे काम करत आहेत असं सांगितलं. मी त्यांना कामगारांमध्ये जा असा सल्ला दिला. तुम्ही लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे विश्वासघात होणं शक्य नाही. शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरेंचा विजय अशा घोषणा देऊन काही होणार नाही. ह्रदयाातून भावना यायला हवी. जर संकटाच्या वेळी आम्ही धावून येणार नसू, तर गरज काय ? भगव्याचं तेज तुम्ही यानिमित्ताने दाखवलं आहे, असं कौतुकही उद्धव ठाकरेंनी केलं.
(संग्रहित दृश्य.)
देशाच्या शत्रूकडून आम्हाला भाकरी किंवा काहीच नको.
बंदी घातल्यानंतर ती तुर्कीएची कंपनी असल्याचं समजलं. आम्हाला तोपर्यंत माहितीच नव्हतं. नवीन कंपनी आली तरी त्यांच्यासह करार कोण करतं ? आणयाची परवानगी कोण देतं ? तुम्ही कंपनीचं काम बंद केलं ही अभिमानाची बाब आहे. देशाच्या शत्रूकडून आम्हाला भाकरी किंवा काहीच नको. पम आणणारे तुमचेच लोक होते. केंद्रात सरकार, नागरी उड्डाण मंत्रालय, एअरपोर्ट प्रशासन हेच लोक करार करतात. आम्ही आमच्या लोकांच्या रोजीरोटीसाठी पाठवतो. एक निमित्त करुन कंपनीला तोडायचं आणि बंद करायचं आणि आपली कंपनी आणून तुम्हाला रस्त्यावर आणतील अशी भिती होती. पण या डावपेचापासून चांगला सामना करत उत्तर दिलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी हात जोडून विनंती करतो की, संकट परतवून लावलं आहे. त्यावर नुसता भरवसा ठेवू नका. उद्या कुणकुण लागली तर ताबडतोबत मला कळवा. उद्या जर कोणाच्या मनात आपले लचके तोडण्याचा विचारा आलं तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ते आपण एकत्र मिळवून ठरवू असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला.