विद्यार्थी आणि पालकांकडून हजारो रुपये स्वतःच्या खात्यात जमा आणि कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक करून कर्मचारी लंपास….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | AAKASH BYJUJ COMPANY | THE EMPLOYEE OF THE COMPANY ABSCONDED WITH THE FEE MONEY OF THE STUDENTS AND LAKHS OF RUPEES OF THE COMPANY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर मधील आकाश बायजूस कंपनीत काम करणार्या कर्मचार्याने विद्यार्थी व पालकांकडून घेतलेली क्लासची तीन लाख ८५ हजार ४७७ रुपयांची फी कंपनीकडे जमा न करता पसार झाला आहे. तसेच तो दोन लॅपटॉप व एक टॅब घेऊन गेला आहे. कंपनीची चार लाख ७५ हजार ४७७ रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी बायजूस कंपनीचे नगर ब्रँच मॅनेजर मृत्युंजय तापेश्वर सिंग (वय ५१ रा. तपोवन रस्ता, सावेडी, मूळ रा. मोरवाडी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्मचारी सचिन भागीरथ भटाटे (मूळ रा. इगतपुरी) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली आहे. ७ जून रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
पैसे कंपनीकडे जमा न करता फसवणूक….
सचिन भटाटे याने आकाश बायजूस कंपनीच्या क्लासची फी म्हणून विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून तीन लाख ८५ हजार ४७७ रुपये स्वतःच्या खात्यात तसेच रोख स्वरूपात घेऊन ते पैसे कंपनीकडे जमा न करता फसवणूक केली तसेच विश्वासाने त्यांच्या ताब्यात दिलेले दोन लॅपटॉप व एक टॅब असा एकूण चार लाख ७५ हजार ४७७ रुपयांचा ऐवज स्वतःच्या वापराकरिता घेऊन पळून गेला असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अंमलदार देवराम ढगे करत आहेत.