पंकजा मुंडेंचा पराभव न सहन झाल्याने “मला आता कोणाचीच गरज नाही, मला फक्त ताईचीच गरज होती” असे म्हणत एका कार्यकर्त्याची आत्महत्त्या…
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | BEED | BJP LEADER PANKAJA MUNDE | A WORKER IN BEED COMMITS SUICIDE DUE TO PANKAJA MUNDE'S DEFEAT IN SOUTH LOK SABHA ELECTIONS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला आहे. पंकजा मुंडेंचा हा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांचा कार्यकर्ता पांडुरंग सोनवणे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई-वडील असे कुटुंब असल्याने त्यांची जबाबदारी आता पंकजा मुंडेंनी उचलावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पांडुरंग सोनवणे हे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डीघोळ आंबा गावातील होते. दरम्यान पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने ते नैराश्येत गेले होते, अशी प्रतिक्रिया आई सरूबाई सोनवणे यांनी दिली आहे. “आम्ही एवढे तिच्यामागे फिरून आमचा उपयोग काय झाला ? मग आमच्या जीवनात काही उपयोग राहिला नाही, असे तो म्हणत होता. शेवटी आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले. तो वेड्यासारखा करू लागला. त्यांचा फोटो घेऊन रडायचा. दवाखान्यात ११ वाजेपर्यंत राहिला. मला जगायचच नाही असे तो म्हणत होता. मला आत्महत्याच करायची आहे, असे म्हणत नाकात नळी असताना पळून आला. मला आता कोणाचीच गरज नाही, मला ताईचीच गरज होती, असे तो म्हणाला. रुग्णालयातून आल्यावर तसाच शेतात गेला. आम्ही येण्याआधीच त्याने शेतात जाऊन आत्महत्या केली”, असं मृत कार्यकर्त्याच्या आईने सांगितले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मृत कार्यकर्त्याचे पंकजा आणि धनंजय मुंडेंवर नितांत प्रेम….
मृत कार्यकर्ता पांडुरंग सोनवणे यांच्या मुलाच्या नावावर सहा गुंठे आणि वडिलांच्या नावावर २७ गुंठे जमीन आहे. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे, अशी माहितीही त्यांच्या आईने दिली आहे. दरम्यान, कार्यकर्त्याने आत्महत्या केल्यावर पंकजा मुंडेच्या कार्यालयातून कोणाचे फोन आले का असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, “कालपासून कोणाचा फोन वगैरे आलेला नाही. पण त्याच्या लेकराच्या भविष्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. त्याची बायको आणि आम्ही म्हातारे-म्हातारी आमची काळजी घ्यावी. आमची प्रॉपर्टी नाही. त्यामुळे आमच्यावर लक्ष देऊन सांभाळावं”, अशी विनंतही त्यांनी केली आहे. यावेळी गावकऱ्यांशीही संवाद साधण्यात आला. गावकरी म्हणाले की, पांडुरंग सोनवणेंचे पंकजा आणि धनंजय मुंडेंवर नितांत प्रेम होते. ४ जूनचा निकाल लागल्यानंतर मी उसतोड कामगार, आता माझं खरं नाही असे म्हणत तो नैराश्येत गेला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. दाखल केल्यानंतर तो एक दिवस दवाखान्यात राहिला. सकाळी स्टँण्डवर आला. ताईंचा फोटो दाखवून रडायला लागला. माझ्या घरासमोर भाजपाची मीटिंग आहे असे सांगून शेताच्या दिशेने गेला आणि शेतात जाऊन आत्महत्या केली.”
स्त्रोत सोशल मिडिया
पंकजा मुंडेंचे एक्सवर पोस्ट करून कार्यकर्त्यांना आवाहन….
ताईंचा अजून फोन आलेला नाही. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तो भाजपाचा कार्यकर्ता होता. त्याचे कुटुंब रस्त्यावर येण्यापेक्षा त्याच्या लेकराबाळांची जबाबदारी घेऊन ताईंनी मदत करावी, अशी आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे”, असे एका ग्रामस्थाने सांगितले आहे. दरम्यान, या आत्महत्येची दखल पंकजा मुंडे यांनीही घेतली आहे. त्यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. “स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी ? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव, तुम्हीही पचवा!! अंधारी रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो. तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.