TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजताच हजर झाले, यावेळी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी हजर होते हे पाहताच आयुक्त संतापले आणि सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेत गेटवरच खुर्ची टाकून बसले व सर्व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत ऑफिसचा टाईम किती आहे हे विचारात होते, शिपाई यांना साडेनऊ तर अधिकारी यांना पावणेदहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर असणे बंधनकारक असतानाही अधिकारी कर्मचारी साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये येत नाही हे पाहताच आयुक्त यांचा पारा चढला होता.


