बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला आहे. या लढतीचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागला होता. त्यामध्ये, पंकजा मुंडेंचा सहा हजार मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांची मोठी नाराजी झाली होती. आपल्या नेत्या पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांनी मतदार मतमोजणी केंद्रावरच अश्रू ढाळले होते. तर बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले आहेत. काही ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडल्या आहेत. आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवले. त्याच आष्टी तालुक्यातील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन पंकजा मुंडेंनी अश्रू पुसले आहेत. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या पोपटराव वायभासे तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच, पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी उचलली आहे.

Pankaja Munde Meets Suicide Victim's Family Beed Lok Sabha Election | ताईंना पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला: पंकजा मुंडेंचाही अश्रुंचा बांध फुटला; लोकसभा पराभवामुळे ...स्त्रोत सोशल मिडिया

पंकजा ताईंचे अश्रू अनावर…. 

ज्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले ते सगळे तरुण होते. त्यांना लहान लेकरे आहेत. माझी विनंती आहे की कुणीही जीव देऊ नये. तुम्हाला हिंमतीने लढणारा नेता हवा असेल तर मलाही हिंमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. यापुढे जर कुणी आत्महत्या केली तर मी राजकारण सोडून देईन. गणेशने अशा प्रकारे पाऊल उचलले. मी आज इथे काय बोलायचे माझ्याकडे शब्दच नाहीत. राजकारणात अनेकदा अनेक ठिकाणी जावे लागते. आज ही वेळ जी माझ्यावर आली आहे ती कोणत्याही नेत्यावर आली नसेल. बीडमध्ये चार जणांनी जीव दिला आहे. पंकजाताईंचा पराभव सहन होत नाही म्हणून जीव दिला आहे. माझ्यासाठी हे समजण्यापलिकडचे आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीला भेटीला मी धावून जाते.गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा शपथ घेतली होती की लढेन पण रडणार नाही. मात्र आज माझे अश्रू अनावर झाले आहेत. असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.