मित्रानेच केली आपल्या मित्राची गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्त्या आणि मृतदेह टाकला….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | CRIME NEWS | MIDC POLICE STATION | ASSISTANT INSPECTOR CHAUDHARY OF MIDC POLICE STATION | THE YOUNG MAN HAS BEEN SHOT AND KILLED FROM THE GAVATHI KATTA | THE MIDC POLICE HAVE REGISTERED A CASE OF MURDER AGAINST BOTH | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या मोरया चिंचोरे (रा.नेवासा) येथील तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह सांगली जिल्ह्यात वारणा नदीकाठी फेकून दिल्याचे आढळले आहे. यासंदर्भात नगर एमआयडीसी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे तर दुसरा फरार आहे. हा फरार आरोपी व मृत तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पूर्वीच सोनई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. भाऊसाहेब रामदास पवार (वय ३२, मोरया चिंचोरे, नेवासा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर गोरख अशोक माळी (मोरया चिंचोरे) हा मुख्य आरोपी फरार आहे, तर रवींद्र किसन माळी (मोरया चिंचोरे) याला ताब्यात घेतल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक चौधरी यांनी दिली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
डोक्यात गोळी झाडून हत्त्या….
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी कि वरील तिघेही मित्र आहेत. गोरख माळी याचे हॉटेल असून हॉटेलचा माल आणण्यासाठी तिघे गोरखच्या मोटारीतून नगरकडे चालले होते. रस्त्यात एमआयडीसीतील दुध डेअरी चौकाजवळ, शेंडी बाह्यवळण रस्त्याने जाताना गोरखने रस्त्यात गाडी थांबवली व मोटारीतील सीटखालून गावठी कट्टा काढून भाऊसाहेबच्या डोक्यात गोळी झाडली आहे. भाऊसाहेबचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचवेळी रवींद्र माळी तेथून पळून गेला आणि नंतर गोरख माळीने भाऊसाहेब पवारचा मृतदेह सांगली जिल्ह्यात करळप याथील वारणा नदीकाठी टाकला होता. या संदर्भात करळप पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत भाऊसाहेब पवारने परिधान केलेल्या बनियानवर बजरंग मित्र मंडळ, मोरया चिंचोरे असे लिहिले होते. त्यावरून त्याची ओळख पटली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल…
घटनास्थळावरून पळालेल्या रवींद्र माळीने घटनेची गावात वाच्यता केल्याने खुनाला वाचा फुटली व त्यातूनच भाऊसाहेब पवार याचा नातलग अण्णा वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोरख माळी व रविंद्र माळी या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडली तेव्हापासून गोरख माळी व भाऊसाहेब पवार बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रवींद्र माळीने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गावठी कट्टा हाताळताना त्यातून उडलेली गोळी भाऊसाहेब पवारच्या डोक्यात गेली. मात्र, मुख्य आरोपी गोरख माळी हा फरार असल्याने त्याबाबत खातरजमा केली जात असल्याचे सहाय्यक निरीक्षक चौधरी यांनी सांगितले. सुरुवातीला कळरप पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा तपासासाठी नगर एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.