पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना, पत्नीला लॉजवर नेत चाकूने वार करत तिची हत्या…..
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | CRIME NEWS | BHARTI UNIVERSITY | A HUSBAND TOOK HIS WIFE TO A LODGE IN BHARTI VIDYAPEETH AND STABBED HER TO DEATH | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना पुणे शहरातील भारती विद्यापीठ येथे घडली आहे. पती पत्नी हे संसाराच्या गाड्याची चाके असतात. मात्र आता पतीने उचललेले पाऊल हे पती-पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारे ठरले आहे. पतीने आपल्या पत्नीला भारती विद्यापीठ येथील एक लॉजवर नेत चाकूने वार करत तिची हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. एका २७ वर्षीय पत्नीचा नराधम पतीने जीव घेतला आहे. या नराधम पतीला भारती विद्यापीठातील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
चाकू भोकसून हत्त्या….
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. मात्र दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचे ठरवले होते. यानंतर पतीने पत्नीला लॉजवर भेटून चर्चा करण्यासाठी बोलवले होते. शनिवारी दुपारी दोघेही भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लॉजवर गेले होते. तिथे त्यांनी मद्यपान केले होते. नशेत त्यांचा पुन्हा वाद झाला आणि या वादातून पतीने चाकूने भोसकून पत्नीची हत्या केली आहे. यानंतर पती बाहेरून लॉक लावून फरार झाला आहे. पती आपल्या मित्रांसोबत मद्यपान करत असताना त्याने ही गोष्ट मित्रांना सांगितली होती. याबद्दल ऐकताच मित्र घाबरले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आहे. पोलिसांनी लॉजवरील मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
पुणे शहरात गुन्हेगारी सत्र सुरूच….
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. मात्र पुणे शहरात अद्यापही गुन्हेगारी सत्र सुरू असलेले पाहायला मिळत आहे. तर पुणे शहरात वाहतुकीच्या बाबतीत अनियमितता पाहायला मिळते. तर याआधी पुणे शहरामध्ये एका शालेय विद्यार्थीनीने एका युवकाला प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्यामुळे युवकाने मुलीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे दहशत निर्माण झाली होती.