By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: “सरकार कोंडीत सापडलेले नाही,उलट त्यांनीच ही आंदोलने उभी केली आहेत”, जरांगेंचा सरकारवर मोठा आरोप….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > “सरकार कोंडीत सापडलेले नाही,उलट त्यांनीच ही आंदोलने उभी केली आहेत”, जरांगेंचा सरकारवर मोठा आरोप….
महाराष्ट्र

“सरकार कोंडीत सापडलेले नाही,उलट त्यांनीच ही आंदोलने उभी केली आहेत”, जरांगेंचा सरकारवर मोठा आरोप….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | INTERVALI SARATI | STATE GOVERNMENT | MARATHA RESERVATION MOVEMENT | MANOJ JARANGE PATIL | LAXMAN HAKE | MANOJ JARANGE'S ACCUSATION AGAINST THE STATE GOVERNMENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/19 at 3:48 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

राज्यात चालू असलेली ओबीसी आंदोलने हे सरकार पुरस्कृत आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या गावात पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर आंतरवाली गावच्या वेशीवर ओबीसी समुदायातील काही लोकांनी उपोषण सुरू केले आहे. लक्ष्मण हाके हे त्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणी देखील ओबीसींची आंदोलने चालू आहेत. या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले आहेत कि आम्ही जसे आंदोलन करत आहोत, तसाच ओबीसींना देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही कोणाला रोखणार नाही, रोखू शकत नाही. त्यांनी त्यांचे आंदोलन करावे, आम्ही आमचे आंदोलन चालू ठेवू आणि मागण्या मांडू.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटिल का महाराष्ट्र सरकार को अल्टीमेटम, कल ही आरक्षण पर निर्णय लें नहीं तो...। Maratha Reservation row Manoj Jarange Patil gives ultimatum to ...स्त्रोत सोशल मिडिया 

मनोज जरांगेंचा सरकारवर  निशाना…. 

ओबीसी आंदोलन सुरू झाल्यामुळे सरकार कोंडीत पकडले गेल्याची चर्चा आहे. सरकारने मराठा समाजाला जी आश्वासने दिली होती ती आता लांबणीवर पडू शकतात किंवा सरकारला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यास वेळ लागू शकतो असे म्हटले जात आहे. सरकारने मराठा समाजाच्या बाजूने निर्णय घेतला तर ओबीसी समाज नाराज होईल आणि ओबीसींच्या बाजूने निर्णय घेतला तर मराठा समाज नाराज होईल. कोणा एकाच्या बाजूने निर्णय घेतला तर दुसरा समाज आक्रमक आंदोलन करू शकतो. त्यामुळे सरकारसमोरील आव्हाने वाढली आहेत. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले, हे सरकार कोंडीत सापडलेले नाही, उलट त्यांनीच ही आंदोलने उभी केली आहेत. ही आंदोलने सरकार पुरस्कृत आहेत. त्यामुळे ते कोंडीत पकडले गेले आहेत असे आपण म्हणू शकत नाही. ही केवळ सरकारची नाटके आहेत. हे सरकार आम्हाला वेडे समजत आहे. सरकार आमच्या आमच्यात भांडणे लावून एका बाजूला स्वस्थ बसून पाहत आहे. मुळात गावखेड्यातले ओबीसी आणि मराठा बांधव एकच आहेत. परंतु सरकार त्यांच्यात भांडण लावून शांत बसतेय.

marataha reservation मनोज जरांगे पाटिल आज आमरण अनशन के प्लान की घोषणा करेंगेस्त्रोत सोशल मिडिया

मी माझे आंदोलन चालूच ठेवणार….

मनोज जरांगे पाटील म्हणाले सरकार या आंदोलनाला अधिक बळ देऊ शकते हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे असे वाटण्याची अनेक कारणे आहेत. आंदोलन अचानक कसे काय सुरू झाले हे त्यातले एक कारण आहे. मी भिती व्यक्त करत नाह, मी शक्यता सांगतोय. हे आंदोलन सरकार पुरस्कृत असू शकते, अन्यथा असे अचानक घडले नसते. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण मिळण्याच्या वेळीच असे कसे काय घडले ? परंतु मी १३ जुलैपर्यंत काही बोलणार नाही. मी माझे आंदोलन चालू ठेवेन. आम्ही कोणाला आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही. तेही आम्हाला रोखू शकत नाहीत. आमच्यावर दादागिरी केली जाते ती वेगळी गोष्ट. परंतु आम्ही कोणाला रोखणार नाही. कारण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांनाच दिला आहे.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येतील- आमदार संग्राम जगताप.
Next Article एका मराठा आंदोलनकर्त्याने मराठा आरक्षणासाठी केली आत्महत्त्या, आत्म्हत्त्येपुर्वी लिहिली जरांगेंना चिट्ठी…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?