एका मराठा आंदोलनकर्त्याने मराठा आरक्षणासाठी केली आत्महत्त्या, आत्म्हत्त्येपुर्वी लिहिली जरांगेंना चिट्ठी…..
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | MARATHA RESERVATION | MANOJ JARANGE | A MARATHA PROTESTER HAS COMMITTED SUICIDE AND A LETTER HAS BEEN WRITTEN TO MANOJ JARANGE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
बार्शी – गेल्या काही महिन्यांपासून मराठी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. नुकतेच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. यावेळी त्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला एका महिन्याची मुदत दिली आहे. याचदरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मराठा आंदोलकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मूळचे बार्शीतील असणारे पण खासगी कंपनीत काम करणारे प्रसाद देठे यांनी चिठ्ठी लिहीत आत्महत्या केली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी (ता. १९ जून) सकाळी आत्महत्या केली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
आत्महत्येपूर्वी प्रसाद यांनी लिहिली चिट्ठी….
आत्महत्येपूर्वी प्रसाद यांनी चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्यांनी आपल्या मुलीची माफी मागत मनोज जरांगे पाटील यांचे नाव लिहीत फक्त मराठा आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नसल्याचे लिहिले आहे. यावेळी त्यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाले. त्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय होते. अनेकदा त्यांनी फेसबुकवरून मराठा आरक्षणाची भूमिका मांडली होती. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी फेसबुकवर लाईव्ह करत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. यावेळी व्हिडीओमध्ये, जरांगे पाटील जिंदाबाद, लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील आहेत. असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटले होते.
स्त्रोत सोशल मिडिया
जरांगेंना आरक्षण घेण्याची विनंती करत आत्महत्त्या….
जयोस्तु मराठा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. तुम्हाला विनंती आहे. हात थरथरतोय म्हणून अक्षर असे आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. जरांगे साहेब, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझे तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालो आहे. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा. मला माफ करा, तुमचाच प्रसाद…”