By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही हे सरकार पाडू, आम्हाला जो फसवणार त्याचा गेम आम्ही लावू – जरांगेंचा सरकारवर निशाणा.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही हे सरकार पाडू, आम्हाला जो फसवणार त्याचा गेम आम्ही लावू – जरांगेंचा सरकारवर निशाणा.
महाराष्ट्र

जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही हे सरकार पाडू, आम्हाला जो फसवणार त्याचा गेम आम्ही लावू – जरांगेंचा सरकारवर निशाणा.

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR | MARATHA RESERVATION | STATE GOVERNMENT | MANOJ JARANGE | LEGISLATIVE ASSEMBLY ELECTION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/21 at 11:47 AM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

छत्रपती संभाजीनगर – राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यासाठी आमचे सर्वेक्षण सुरु आहे. एकूण सहा टप्प्यात हे सर्वेक्षण होणार आहे. त्यानंतर २८८ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन कोणत्या जागांवर ताकदीने निवडणूक लढवायची, हे निश्चित केले जाईल. आतापर्यंत आम्ही विधानसभेच्या १२७ जागांची चाचपणी केल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.

मनोज जरांगे यांचे सरकार आल्यावर कॅबिनेट कसे असणार, सांगितली विधानसभेची  रणनीती - Marathi News | Maratha reservation leader Manoj Jarange Patil will  contest 288 assembly seats marathi news ...स्त्रोत सोशल मिडिया 

मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा…..

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज एकत्रित येऊन कशाप्रकारे निवडणूक लढवू शकतो, याबाबत ढोबळ माहिती दिली आहे. मराठा समाजाविरोधात काड्या करणाऱ्यांना आणखी दोन-चार महिन्यांनी आम्ही घरी पाठवू. ते आम्हाला खड्यात घालणार असतील तर आम्ही त्यांना १०० टक्के बुडवणार आहोत. राज्य सरकारमधील आठ ते नऊ मंत्री मराठाद्वेष्टे आहेत. ते मराठ्यांविरोधात काड्या करत असतात. दंगली झाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न करतात. या सगळ्यांचा आम्ही विधानसभा निवडणुकीला ठरवून कार्यक्रम करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. राज्य सरकारने आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही पूर्वीसारखे रडत बसणार नाही. आधी सरकारनेच सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कायदेतज्ज्ञ आणले. आता तुम्हीच हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, अशी भाषा सुरु केली आहे. पण आता आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही हे सरकार पाडतच असतो. आता आम्हाला जो फसवणार त्याचा गेम आम्ही लावू. एकदा आम्ही गेम केला आहे आता पुन्हा एकत्र जमून गेम करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात कोणत्या ६  मुद्द्यांवर चर्चा झाली? सगेसोयरे कोण? याची व्याख्याही जरांगेंनी ...स्त्रोत सोशल मिडिया 

मराठा नेत्यांनीही समाजाच्या सभांना, बैठकांना आले पाहिजे-मनोज जरांगे 

आतापर्यंत आम्ही राज्यातील १२३ ते १२७ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. आमचे सर्वेक्षणाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतील काही जागांवर चाचपणी करण्यात आली आहे. सहा टप्प्यात २८८ जागांचा आढावा घेतल्यानंतर आम्ही किती जागांवर फोक ठेवायचा, हे ठरवू. आपल्या किती जागा जिंकणार, हे आम्ही ठासून सांगू. आमचा एक्झिट पोलच वेगळा असणार आहे. वेळ पडली तर आम्ही सगळे चर्चा करुन २८८ जागांवर मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे की २८८ जागांवर उमेदवार पाडायचे हे ठरवू. असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांनाही इशारा दिला आहे. विरोधी लोक बोंबलत आहेत, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यांचा नेता बोंबलत आहे. मराठ्यांनी मते देऊनही ते तुमच्या छाताडावर पाय देत आहेत. तुम्ही मतदान करुनही त्यांना जातीचा इतका स्वाभिमान असेल तर मग तुम्हाला का नसावा ? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना विचारला आहे. त्यांचे नेते त्यांच्या समाजाच्या आंदोलनात जात असतील तर आता मराठा नेत्यांनीही समाजाच्या सभांना, बैठकांना आले पाहिजे. आम्हीही आमच्या जातीच्या मोर्चात जाऊ, असे मराठा नेत्यांनी सांगितले पाहिजे. अन्यथा या नेत्यांनाही निवडणुकीत मराठा समाज पाडेल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article नगरमधील एका अल्पवयीन मुलीला दोन महिलांनी भर रस्त्यात लुटले…..
Next Article सहा वर्षाच्या मुलीवर अत्त्याचार करून तिची निर्घुण हत्त्या, संतापलेल्या नागरिकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?