वटपोर्णिमेच्या दिवशी पतीने पत्नीला ऑफिसमधून गाडीपर्यंत फरफटत नेत केले अपहरण आणि तिला वारंवार देत होता….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | PIMPRI CHINCHWAD | WAKAD POLICE STATION | A MARRIED WOMAN WAS KIDNAPPED BY HER HUSBAND | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पिंपरी चिंचवड – वटपोर्णिमेच्या दिवशी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचे भरदिवसा अपहरण करण्यात आले होते. ऑफिसमधून गाडीपर्यंत तिला फरफटत नेण्यात आले होते. दोन दिवस तिला वारंवार भुलीचे इंजेक्शन देवून गाडीतच डांबून ठेवण्यात आले होते. कशीबशी तिने स्वतःची सुटका केली अन् वाकड पोलीस स्टेशन गाठले आहे. अंगावर काटा आणणारा प्रताप महिलेच्या पतीनेच केला होता. सुमित शहाणे असे महिलेच्या पतीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
पत्नीला वारंवार भुलीचे इंजेक्शन….
पुण्याच्या मंचरमधील हे दाम्पत्य असून ऑगस्ट २०२३ मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. मात्र आठवडाभरात पती सुमितने नको त्या मागण्या सुरू केल्या, ज्या पत्नीला पचनी पडल्या नाहीत. मग तिने सुमितपासून लांबच राहने पसंत केले होते. तिने थेट मुंबई गाठली होती तिथे काही महिने ती मैत्रिणीकडे राहिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ती नोकरीसाठी पिंपरी मध्ये आली होती. इथे एका बांधकाम व्यवसायिकाकडे तिने काम सुरू केले होते. याचा सुगावा सुमितला लागला अन् त्याने पत्नीच्या ऑफिसचा पत्ता काढला. १९ जूनला सुमित आई आणि चालकासोबत वाकडमध्ये आला. दुपारी साडे तीनच्या सुमारास पत्नीला फरपटत गाडीत बसवले. त्यावेळी पत्नीचा मित्र ही जबरदस्तीने गाडीत बसला होता. गाडी मंचरच्या दिशेने निघाली, थोडे पुढे गेल्यावर सुमितने पत्नीच्या मित्राला कानशिलात लगावली आणि गाडीतून बाहेर ढकलून दिले. तिथून पुढचा प्रवास सुरु झाला होता. त्या प्रवासात सुमितने पत्नीला भुलीचे इंजेक्शन दिले तिला घेऊन थेट घरी न जाता गाडीतच डांबून ठेवले होते. या दरम्यान ती शुद्धीवर आली की तो वारंवार भुलीच इंजेक्शन द्यायचा, असा आरोप पत्नीने तिच्या पातीवर केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
पोलिसांनी केली त्या पत्नीची सुटका….
२० जूनच्या दुपारी तिने सुमितला विश्वासात घेतले आणि तो सांगेन त्या कागदपत्रांवर सही करते, असे ती सुमितला म्हणाली. मग सुमितने गाडी मंचर परिसरात आणली, मात्र माझी भूल अद्याप उतरली नाही, असा बहाणा तिने केला, मग ते मंदिरात थांबून राहिले. त्यावेळी पत्नीने एका तरुणास खुनवत, मदतीची मागणी केली. त्या तरुणाला ही काहीतरी गडबड असल्याचे समजले, मग तिथे मंचर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलीस मंदिरात पोहचले अन पत्नीची सुमितच्या तावडीतून सुटका झाली. घडला प्रसंग विवाहित महिलेने सांगितला असून तिचे पती, आई आणि चालकावर अनेक आरोप आहेत. आज सकाळी पत्नीने वाकड पोलीस स्टेशन गाठले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपहरण ते सुटका या दरम्यान बेशुद्ध असताना नेमके काय-काय घडले होते याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.