बहिणीनेच दिली राष्ट्रवादीच्या त्या नेत्याच्या खुनाची सुपारी.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | IMPORTANT UPDATE IN VANRAJ ANDEKAR MURDER CASE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाने पुणे शहर हादरले होते. या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आंदेकर यांच्या तीन बहिणींचाही समावेश आहे. त्यासोबतच तीन अल्पवयीन आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता मोठी अपडेट या खून खटल्यात समोर आली आहे.वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यानंतर धारदार शस्त्रांनी भोसकण्यात आले होते. वनराज आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले, पण त्यांचा मृत्यू बंदुकीच्या गोळीने नाही तर, धारदार शस्त्रांनी भोसकल्याने झाल्याचे समोर आले होते. आंदेकर यांच्या हत्येसाठी शस्त्र पुरवणारा म्होरक्या पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे. हत्येसाठी शस्त्र पुरवणारा संगम संपत वाघमारेला पोलिसांनी अटक केली आहे.
(संग्रहित दृश्य.)
हत्येसाठी त्याच्या बहिणींनीच सुपारी दिली.
वनराज आंदेकर यांच्या हत्येने पुण्यात टोळीयुद्ध सुरु झाले का अशी चर्चा सुरु झाली होती. वनराज आंदेकरच्या हत्येसाठी त्याच्या बहिणींनीच सुपारी दिल्याचे समोर आले. हत्येसाठीची शस्त्र संगम संपत वाघमारे या वीस वर्षांच्या तरुणाने पुरवली असल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सापळा रचून वाघमारेला ताब्यात घेतलं होत. त्याला अटक करुन रविवारी सुटी कालीन न्यायलयात हजर करण्यात आले होते. कोर्टाने ११ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
(संग्रहित दृश्य.)
कौटूंबिक वादातून हत्या.
३१ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ८:३० दरम्यान नाना पेठेत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून भर चौकात त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पुणे शहर हादरुन गेले. ६ ते ७ टू व्हीलरवरुन १३ ते १५ जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली. कोयत्यानं हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. कौटूंबिक वादातून हत्या झाल्याचे या प्रकरणी समोर आले आहे. आंदेकर यांच्या बहिणी आणि दाजींनींच त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.