TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर महराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे.रोज नवनवीन इच्छुक चेहरे समोर येत असून आता राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.आगामी विधानसभा निवडणुक ही आपण राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून शिवाजी कर्डिले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली होती.त्यातच काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शिवाजी कर्डिले हे राहुरी ऐवजी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील असं वाटत असताना आता शिवाजी कर्डिले यांनी आपण राहुरीतुनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
(संग्रहित दृश्य.)
तुतारी वाजणार कि कमाल फुलणार ?
२०१९ मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांचा दारूण पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजी कर्डीले हे आता सज्ज झाले असून राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच मला राहुरीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला असल्याचं शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.