By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: नगरमध्ये कळमकर यांना मिळणार खुली व छुपी रसद,कोतकर देखील आपली राजकीय ताकद दाखवण्यास इच्छुक निवडणुकीत चुरस वाढवणार ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > नगरमध्ये कळमकर यांना मिळणार खुली व छुपी रसद,कोतकर देखील आपली राजकीय ताकद दाखवण्यास इच्छुक निवडणुकीत चुरस वाढवणार ?
अहमदनगर

नगरमध्ये कळमकर यांना मिळणार खुली व छुपी रसद,कोतकर देखील आपली राजकीय ताकद दाखवण्यास इच्छुक निवडणुकीत चुरस वाढवणार ?

Last updated: 2024/10/27 at 1:51 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

नगर शहर विधानसभा मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीकडून माजी महापौर अभिषेक कळमकर रिंगणात उतरणार आहेत. एकीकडे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी नक्की असल्याने दोन अडीच महिन्यांपूर्वीच संपर्क अभियान सुरू केले होते. त्याचवेळी मविआमध्ये जागा कोणाला सुटणार इथ पासून तिढा होता. परंतु माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उमेदवारी गृहीत धरून महिनाभरापासून तयारी चालवली होती. परंतु त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब होत नव्हता. आज उमेदवारी निश्चित झाल्यानं कळमकर आता आणखी जोमाने लढत देण्यास सज्ज झाले आहे. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेसमधील इच्छुकांची मोट बांधण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे.

Abhishek Kalamkar (@abhishek_kalamkar) • Instagram photos and videos(संग्रहित दृश्य.)

नगरचे महापौरपद ही भूषविले होते.

अभिषेक कळमकर हे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. एकत्र राष्ट्रवादीत असताना त्यांनी नगरचे महापौरपदही भूषविले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ दिली. तेव्हापासूनच ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार होते. त्यांनी नगर जनसंवाद यात्रा काढून शहरातील सर्व प्रभाग पिंजून काढलेत. मविआच्या इतर इच्छुकांच्या तुलनेत कळमकर यांनी संपर्क मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली. शहरातील राजकीय गणिते, मागील काही काळात झालेल्या घडामोडी पाहता पडद्यामागे अजून खूप हालचाली होऊ शकतात. भाजपमधील एक गट शहराची जागा अजित पवार गटाकडे गेल्याने नाराज आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांनी तांत्रिक अडचणींमुळे माघार घेतली असली तरी ते शहरातील आपली राजकीय ताकद दाखवण्यास इच्छुक आहेत. अशा वेळी कळमकर यांना मिळणारी खुली आणि छुपी रसद निवडणुकीची रंगत वाढवणारी ठरू शकते.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article गाड्यांची जाळपोळ व कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न ; बाळासाहेब थोरात समर्थक नेत्यांवर गुन्हा दाखल.
Next Article मागील पंचवार्षिकचे अपयश धुवून काढण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंची खेळी यशस्वी होणार ?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?