स्वच्छ सुसंस्कृत म्हणवून घेणार्याच्या दडपशाहीचा चेहरा आता राज्याला समजला आहे. भगिनीना पुढे करून राजकारण करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. ठेकेदाराच्या जीवावर सामान्य माणसांना खेटलात तर ,आता गाठ आमच्याशी आहे. धांदरफळ घटनेमागील मास्टर माईड शोधल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. धांरफळ येथील सभेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यावर झालेला हल्ला तसेच वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत मंत्री विखे पाटील यांनी थोरात यांच्या दडपशाही विरोधात सडकून टिका केली. तालुका हा सामान्य माणसाचा आहे. कोणाची मालकी यावर नाही. तालुक्यात येण्यासाठी बंदी घालता हीच तुमची लोकशाही आणि सुसंस्कृतपणा असा सवाल उपस्थित करून केवळ माफियांच्या जीवावर या तालुक्यात दहशत निर्माण केली गेली असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.