अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. मागील दहा वर्षांमध्ये केलेली विकास कामे व जनतेच्या सुखदुःखात सामील होत थेट संपर्क ठेवला असल्यामुळे ऋणानुबंध निर्माण झाले असून आता माझी निवडणूक थेट जनतेनेच हाती घेतले आहे. तोफखाना, बागडपट्टी, सर्जेपुरा, परिसरामध्ये नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो असता मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी नागरिकांच्या वतीने ठिक-ठिकाणी फुलांचा वर्षाव आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात येत होती. जनतेचे प्रेम पाहून माझा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा नगरकरांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून केलेली विकास कामे नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जाण्यास यशस्वी झालो आहे.