Salman Khan Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी प्रकरणातील बिश्नोई टोळीशी संबंधित दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सलमान खान याला गेल्या काही महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. गेल्या वर्षी सलमानच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आला होता. सलमान खानला धमकीचा ई-मेलही आला होता. त्यानंतर सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्रही मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत बिश्नोई गँगशी संबंधित काही जणांना अटक केली होती.
(संग्रहित दृश्य.)
फार्महाऊसवर मारण्याचा कट…
बिश्नोई गँग गेल्या वर्षीपासून सलमान खानच्या मागे हात धुवून लागल्याचं पाहायला मिळत आहे. धमकीचे मेसेज, धमकीचे ई-मेल, पत्र आणि गोळीबार अशा अनेक घटना घडल्या आहेत. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर अनेक गोष्टी आढळल्या आहेत. आरोपींनी सलमान खानला मारण्याचा कट रचला होता. त्यांनी सलमानचं घर आणि पनवेलच्या फार्महाऊसची रेकीही केली होती. याशिवाय, सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा कट होता, असंही आरोपींनी कबूल केलं होतं.
(संग्रहित दृश्य.)
हत्येचा कट रचल्याबद्दल लॉरेन्स बिश्नोई टोळीतील १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल….
दरम्यान या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपींना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या आरोपींना पोलिसांनी गेल्या वर्षी अटक केली होती. हे दोन्ही आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोन आरोपींना जामीर मंजूर केला आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार न्यायमूर्ती एन आर बोरकर यांनी आरोपी गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई आणि वासपी महमूद खान यांना जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणात आरोपींना जामीन देण्याचं कारण समोर आलेलं नाही. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन अर्ज मंजूर केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आरोपींनी जामीन देण्याच्या निर्णयाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या दोघांनी इतर आरोपींसह मिळून गेल्या वर्षी सलमान खानच्या मुंबईजवळील पनवेल फार्महाऊसची रेकी केली होती, असा दावा नवी मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात, सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याबद्दल लॉरेन्स बिश्नोई टोळीतील १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.