सलमान खान भावूक…..
सलमान खाननंही अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. सलमान खानन म्हटलं की, आज खूप दु:खद घटना घडली आहे. हा सर्वांसाठी दुःखद काळ आहे. आयएसआरएल आणि सलमान खान या कठीण काळात देशासोबत उभे आहेत. हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, कारण ही वेळ कोणतेही सेलिब्रेशन करण्याची नाही. आम्ही देशासोबत आहोत. मृतांच्या कुटुंबियांप्रति आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत.