By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: भावानेच रचला भावाच्या हत्येचा कट,चक्क भावाची हत्या करण्यासाठी दिली १२ लाखांची सुपारी ; रुग्णालयात पोलिसांच्या तपासावर होती नजर ?
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > भावानेच रचला भावाच्या हत्येचा कट,चक्क भावाची हत्या करण्यासाठी दिली १२ लाखांची सुपारी ; रुग्णालयात पोलिसांच्या तपासावर होती नजर ?
क्राईम न्यूज

भावानेच रचला भावाच्या हत्येचा कट,चक्क भावाची हत्या करण्यासाठी दिली १२ लाखांची सुपारी ; रुग्णालयात पोलिसांच्या तपासावर होती नजर ?

Last updated: 2025/02/12 at 6:20 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

पुणे : जिल्ह्यातील नावाजलेली एमआयडीसी असलेल्या चाकण एमआयडीसी परिसरात दिवसाढवळ्या एका उद्योजकावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. २०  जानेवारी रोजी चाकण एमआडीसी येथील स्टील कंपनीच्या मालकावरच गोळ्या झाडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आता, याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून चक्क चुलत भावानेच, ज्याला अजयसिंह आदर्श मानत होता त्या संग्रामसिंगनेच अजयच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासातून पुढे आलं. विशेष म्हणजे १२ लाख रुपयांत भावाला ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती. याप्रकरणी, पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून नुकतेच एकाला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतरच, भावानेच सुपारी दिल्याचं गुढ उघडकीस आल आहे.चाकण औद्योगिक वसाहतीत २० दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी तर दुसरी गोळी पाठीत लागलेली होती. दोन अज्ञात दुचाकीवर आले अन् त्यांनी कंपनीच्या गेटवरुनच कंपनीच्या मालकांवर हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले होते. आता, याप्रकरणी पोलीस गोळीबाराच्या घटनेच्या मुळाशी पोहोचले असून उद्योजक अजय सिंग यांच्या चुलत भावानेच भावाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राज्यात २० बांगलादेशी नागरिकांना अटक, बोरिवली पोलिसांची कारवाई | 20  Bangladeshi nationals arrested in the state Borivali police action(संग्रहित दृश्य.)

अटक केल्यावर आता नवी माहिती समोर आली.

आता जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीमध्ये झालेल्या गोळीबाराने वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळतय.  चुलत भावानेच भावाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. कौटुंबिक वाद आणि व्यावसायीक ईर्षेतून त्याने ही सुपारी दिली होती. संग्रामसिंग असं सुपारी देणाऱ्या चुलत भावाचे नाव असून त्याने अजय सिंगची हत्या करण्यासाठी चौघांना सुपारी दिली होती. हत्येच्या उद्देशाने कैलास स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर अजय सिंगवर गोळीबार झाला होता, अजय त्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी रोहित पांडेला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केल्यावर आता नवी माहिती समोर आली आहे. याप्रकरणात चक्क चुलत भावाचे बिंग फुटले आहे. अजय आधी संग्रामकडे कामाला होता, अजयला या स्टील क्षेत्रात संग्रामनेचं आणलं होतं. मात्र, अजय मोठा होऊ लागला, हे संग्रामला पचत नव्हतं. त्यातून संग्रामने अजयची सुपारी दिली अन् सगळा प्रकार घडला. या दरम्यानच्या काळात चुलत भाऊ जखमी भावाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्येही आला होता.पिंपरी चिंचवड पोलीस काय-काय तपास करतायेत, याचीही माहिती तो घेत होता.मात्र, अखेर पोलीस तपासात त्यानेच सुपारी दिल्याचं उघडकीस झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, हे ऐकून अजयला मात्र विश्वास बसला नाही.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article फेसबुकच्या मालकाला पाकिस्तानने सुनावली फाशीची शिक्षा ; मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः केला खुलासा….!
Next Article कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले पायउतार ? प्रदेशाध्यक्ष पदाची माळ त्या नेत्याच्या गळ्यात !
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?