By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: आईच्या प्रियकराला संपवले ; आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी दगडाने ठेचून केला कामगाराचा खून.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > आईच्या प्रियकराला संपवले ; आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी दगडाने ठेचून केला कामगाराचा खून.
क्राईम न्यूज

आईच्या प्रियकराला संपवले ; आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी दगडाने ठेचून केला कामगाराचा खून.

Last updated: 2025/02/21 at 10:43 AM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

SANGLI CRIME / SANGLI POLICE   : सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर गुरुवारी (दि. २०) दुपारी एका कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा यशस्वी छडा आता पोलिसांना लावला आहे. आईसोबत कामगाराचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांसमवेत ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात देखील घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर दत्ता सुतार (३५ रा. इंदिरानगर, सांगली) या कामगाराचा खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. मृतदेहाजवळच मृताची दुचाकी आढळून आली होती. हल्लेखोरांनी दगडाने कामगाराला ठेचले. यामुळे तीव्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

कोर्ट से हत्या का आरोपी फरारः पुलिस को चकमा देकर हथकड़ी सहित आरोपी फरार,  हत्या के मामले में लाया गया था पेशी पर | Murder accused absconding from  court: The accused ...(संग्रहित दृश्य.)

तिघेही अल्पवयीन…

याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यास माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. घटनास्थळी हल्लेखोरांनी चाकू व कोयता टाकला असला तरी त्यावर रक्ताचे डाग दिसत नव्हते. यामुळे या हत्याराचा वापर केला गेला की नाही ? याचा उलगडा होत नव्हता. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासातच तीन संशयितांना ताब्यात घेतले. या तिघांची चौकशी केली असता एकाने त्याच्या आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध असल्याचे सांगितले.आई सोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून दोघा साथीदारांच्या मदतीने त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. पोलीस तपासात तिघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज शुक्रवार (दि.२१) या तिघांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अजित पवारांना मोठा धक्का ; त्या मंत्र्याला २ वर्षांची शिक्षा, आमदारकी व मंत्रिपद धोक्यात ?
Next Article छ.संभाजी महाराजांची औरंगजेबानं हत्या केली,तर शाहूं महाराजांना औरंगजेबाच्या मुलानं मुक्त केल….पण त्यानंतर महाराणी येसूबाई अन् त्यांच्या मुलाचं काय केलं ?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?