By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले ; पोलीस हेच खरे गुन्हेगार,गावकऱ्यांकडून ‘पोलिसी’ कारभाराची चिरफाड……अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले ; पोलीस हेच खरे गुन्हेगार,गावकऱ्यांकडून ‘पोलिसी’ कारभाराची चिरफाड……अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय.
महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले ; पोलीस हेच खरे गुन्हेगार,गावकऱ्यांकडून ‘पोलिसी’ कारभाराची चिरफाड……अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय.

Last updated: 2025/02/22 at 1:56 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

SANTOSH DESHMUKH / MLA SURESH DHAS : पोलिस यंत्रणेवर आता आमचा विश्वास नाही, संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वी जर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असता तर हे झालं नसतं,  त्यामुळे पोलीस हेच खरे गुन्हेगार आहेत, चांगल्या अधिकाऱ्यांना आम्ही चांगलेच म्हणत आहोत. मात्र, आरोपींसोबत ज्यांनी हात मिळवणी केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आरोपी गुर्मीत असून आरोपींचे मनोबल वाढवले जात आहे, आम्ही समाधानी नाहीत, आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची भूमिका असून आम्हाला इतर कोणत्याही गोष्टीबाबत देणं घेणं नाही, अशा शब्दात  बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भाजप आमदार सुरेश यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला आहे. गावकऱ्यांनी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार सुरेश धस मस्साजोगमध्ये पोहोचले आहेत. यावेळी गावकऱ्यांनी पोलिसी कारभाराची चिरफाड केली आहे. आम्ही सर्वजण अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहोत,२५ तारखेला आम्ही आंदोलन करणार आहोत,प्रशांत महाजन आणि राजेश पाटील हे दोन पोलीस सह आरोपी झालेच पाहिजेत.इथच पुरावे कमकुवत झाले तर पुढे कसे होणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

Beed Case: संतोष देशमुख यांच्या भावाला पोलिस संरक्षण, मस्साजोग ग्रामस्थांची  मागणी मान्य | Santosh Deshmukh Beed Case Police Protection for Dhananjay  Deshmukh | Saam Tv News(संग्रहित दृश्य.)

हा प्रकार आरोपींना वाचवण्यासाठी……

सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले की, पहिल्या आठ दिवसांच्या तपासासंदर्भात सुरेश धस यांच्यासोबत चर्चा केली.आम्ही दिलेल्या मागण्या आमदार धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे द्याव्यात, पोलीस यंत्रणेच्या चुकामुळे हा खून झाला आहे. कृष्णा आंधळे फरार फक्त कागदोपत्री होता. मात्र, तो सर्रासपणे फिरत होता. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास पोलिसांसोबत सर्वकाही दिसून येत आहे. कृष्णा आंधळेवर यापूर्वी कारवाई का केली नाही ? सीआयडीकडे तपास दिल्यानंतर केज पोलिसांनी निष्क्रिय पद्धतीने काम केल्याचे समोर आले. केज पोलिसांनी तपास यंत्रणाकडे पुरावे दिले नाही. हा प्रकार आरोपींना वाचवण्यासाठी झाला असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.

Police Uniform,वर्दी के लिए खुद कपड़ा खरीदेगी महाराष्ट्र पुलिस -  maharashtra police to buy clothes for uniform on their own - Navbharat Times(संग्रहित दृश्य.)

त्या पोलिसाने मुद्दामहून चुकीचे लोकेशन सांगितले…..

धनंजय देशमुख पुढे म्हणाले की, पोलिस अधिकारी प्रशांत महाजन हे १५ मिनिटात टोल नाक्यावर पोहचले. त्यांनी मुद्दामहून आम्हाला चुकीचे लोकेशन सांगितले.विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये वाल्मीक कराडला भेटायला राजेश पाटील का गेला होता ? अशीही विचारणा गावकऱ्यांनी केली आहे. प्रशांत महाजन हे केज पोलीस स्टेशन मध्ये का येतो ? असाही सवाल गावकऱ्यांनी केला आहे. केज पोलिसांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत, नागरिकांनी सीसीटीव्ही पुरावे यंत्रणेला सादर केले आहेत. संवेदनशील केसमध्ये त्यांनी लक्ष दिले पाहिजे होते. आरोपींचे फोन कॉल पोलिसांना का गेले ? कृष्णा आंधळे हा पहिला गुन्ह्यातील फरार आरोपी तरी देखील त्याला पोलिसांचे अभय आहे. खालील पातळीहून रिपोर्टिंग चुकीची जाते, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article छ.संभाजी महाराजांची औरंगजेबानं हत्या केली,तर शाहूं महाराजांना औरंगजेबाच्या मुलानं मुक्त केल….पण त्यानंतर महाराणी येसूबाई अन् त्यांच्या मुलाचं काय केलं ?
Next Article छत्रपतींच्या छावात विकी कौशल पहिली पसंत नव्हता ; तर त्या दक्षिणात्य अभिनेत्याला होती प्रथम संधी परंतु अभिनेत्याने……
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?