भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती आणि HR कंपनी Rippling चे संस्थापक प्रसन्न शंकर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे सध्या चर्चेत आले आहेत. १० अब्ज डॉलर्सच्या कंपनीचे मालक असलेले प्रसन्न शंकर यांना त्यांच्या पत्नीकडून धोका मिळालाय. त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत आणि मुलाला जबरदस्तीने अमेरिकेत नेलं असल्याचंही प्रसन्न शंकर यांनी म्हटलंय.अब्जाधीश उद्योगपती प्रसन्न शंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, माझं नाव प्रसन्न आहे. मी १० अब्ज डॉलर्स एवढी किंमत असलेल्या रिपलिंग कंपनीची स्थापना केली होती. मात्र, अजूनही मी घटस्फोटाच्या प्रक्रियेतून बाहेर आलेलो नाही. सध्या मी चेन्नई पोलिसांपासून लपून तामिळनाडूच्या बाहेर लपलोय. माझ्या लग्नाला १० वर्षे होऊन गेली आहेत. मला पत्नी दिव्यापासून १० वर्षांचा मुलगा आहे. अलिकडेच मी आणि माझी पत्नी वेगळे झालो आहोत. मला कळले की तिचे अनूप नावाच्या व्यक्तीसोबत 6+ (सहा महिन्यांहून अधिक) महिन्यांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे मी तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय.
(सोशल मिडिया व्हायरल पोस्ट)
अनुप नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर….
प्रसन्न शंकर हे चेन्नईत जन्मलेले आणि तिथेच शिक्षण घेतलेले उद्योजक आहेत. प्रसन्न शंकर यांनी पुढे लिहिलं की, त्रिचीमध्ये शिक्षण घेत असताना माझी भेट दिव्या शशिधर हिच्याशी झाली. मी भारतातील नंबर १ चा कोडर होतो. दरम्यान, त्यानंतर टेक्नोलॉजीशी निगडीत कंपनी सुरु करण्यासाठी मी अमेरिकेत गेलो होतो. दरम्यान, माझ्या लग्नाला आता १० वर्ष होऊन गेले आहेत. मला ९ वर्षांचा मुलगा आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी मला समजलं की, माझी पत्नी मला धोका देत आहे. तिचं अनुप नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर सुरु आहे. त्यामुळे आम्ही आता वेगळे झालो आहोत.
(संग्रहित दृश्य.)
अमेरिकन कोर्टाने माझ्या मुलाला परत करण्याचे आदेश दिले.
प्रसन्न शंकरने पुढे सांगितले की, मला त्यांच्या अफेअरबाबत अनूप कुट्टीसंकरनच्या पत्नीकडून समजले. अनुपच्या पत्नीने दोघांमध्ये होत असलेल्या चॅटींगचे स्क्रिनशॉट मला पाठवले. त्यांनी त्याच्यासाठी हॉटेल बूक केल असल्याचा दावाही प्रसन्नने केला आहे. प्रसन्नने सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये दिव्याने अनुपला मेसेज केलाय. यामध्ये दिव्या म्हणते, तू माझ्यासाठी XL साइजचं कंडोम घेऊन ये शकतो का ? हे Guardian, Watsons किंवा 7-Eleven मध्ये मिळू शकतं. या मेसेजला प्रत्युत्तर देऊ नको. मी ते मेसेज डिलीट करणार आहे. घटस्फोटानंतर मला तिला किती मिलियन डॉलर्स द्यावे लागतील, या मुद्द्यावर आम्ही दोघंही चर्चा करत होतो. यामुळे ती नाराज झाली आणि तिने माझ्यावर घरगुती हिंसाचाराचा खोटा गुन्हा दाखल केला. नंतर तिने खोटे आरोप केले की मी तिचे नग्न व्हिडिओ लीक केले आणि महिनाभरापूर्वी तिच्यावर बलात्कार केला. सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी करून मला या सर्व आरोपातून दोषमुक्त केले आहे. मी घटस्फोटासाठी भारतात प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र दिव्याने जास्त पैसे मिळावेत, यासाठी अमेरिकेत दावा केला आहे. प्रसन्ना यांनी दावा केला की, त्यांच्या पत्नीने त्यांच्या ९ वर्षांच्या मुलाला अमेरिकेला नेण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तिला घटस्फोट प्रकरणात मदत मिळू शकेल. ज्यांच्या विरोधात मी अमेरिकन कोर्टात आंतरराष्ट्रीय बाल अपहरणाचा खटला दाखल केला. या प्रकरणात न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल देत माझ्या मुलाला परत करण्याचे आदेश दिले आहेत.