By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: भावाने मित्राच्या सहाय्याने केला बहिणीवर अत्याचार ; लॉजवर नेऊन केले असे कृत्य की….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > भावाने मित्राच्या सहाय्याने केला बहिणीवर अत्याचार ; लॉजवर नेऊन केले असे कृत्य की….
क्राईम न्यूज

भावाने मित्राच्या सहाय्याने केला बहिणीवर अत्याचार ; लॉजवर नेऊन केले असे कृत्य की….

Last updated: 2025/03/26 at 12:07 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

बार्शी: बार्शी तालुक्यामध्ये मानलेल्या बहिणीवरती भावासह तिच्या प्रियकराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मानलेल्या भावाने व प्रियकराने मिळून ३४ वर्षीय विवाहित महिलेला कारमधून कुडूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेऊन तेथे तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावरती सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार बार्शी तालुक्यात घडला. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. सुरेश परसु माळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पिडीत ३४ वर्षीय पिडितेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.

Himachal: मंडी जिला में इस वर्ष महिलाओं पर हुए सबसे अधिक अत्याचार, दूसरे नंबर पर हैं ये 3 जिले - most atrocities against women this year in mandi-mobile(संग्रहित दृश्य.)

पिडितेचे सुमारे ७ वर्षांपासून प्रेमसंबंध….

मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचा नवरा पुण्यामध्ये सेंट्रींग काम करतो तर पिडित विवाहित महिला ३ महिन्यांपासून आपल्या मुलीसोबत बार्शीमध्ये राहते. सुरेश परसु माळी याच्यासोबत संबंधित पिडितेचे सुमारे ७ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरेशचा मित्र संतोष भास्कर भानवसे हा विवाहीतेला बहीण मानत होता. सुरेश माळी व संतोष भानवसे हे दोघे सप्टेंबर महिन्यात पुण्यातून पीडितेला बार्शीकडे न्यायला आले. त्यास पीडितेने नकार देताच सुरेशने तिला मारहाण केली होती.त्यानंतर पिडित विवाहित महिला बार्शीत आल्यावर संतोषने सांगितले की तू माझी बहीण आहेस. तुझं सुरेश एकतो त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न जमवून दे. तेव्हा सुरेशशी बोलून त्याच्या मुलीचे संतोषच्या मुलाशी लग्न जुळवून दिले. दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी पिडिता महिला लग्नाला आली होती. लग्न झाल्यानंतर पीडितेचा पती जास्त दारूच्या नशेत असल्याने त्याला सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी वऱ्हाडाच्या गाडीत पाठवून दिले. त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास या दोघांनी मिळून पिडितेस चल तुला घरी तुझ्या गावी घेऊन जातो असे म्हणून सुरेश माळी याने त्याच्या स्वीफ्ट गाडीमध्ये बसवून कुर्डूवाडी रोडवरील लॉजवर नेलं. तिथे सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी आळीपाळीने महिलेवर अत्याचार केला. तसेच तू गावात राहायचे नाही. तू पुण्यात जाऊन राहायचे. जर पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने करत आहेत.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article पत्नी परपुरुषाच्या मिठीत दिसली. संतापलेल्या पतीने पत्नी व तिच्या प्रियकराची चांगली धुलाई केली….
Next Article आमदार संग्राम जगताप एक्शन मोडवर ; नागरिकांच्या समस्यांसाठी थेट पोलीस अधीक्षकांना सवाल… अधिकारी नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटमारीसाठी
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?