By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: सुजय विखे राज्यात आले तर आमचे मंत्रीपद अडचणीत येईल त्यांचे पुनर्वसन आम्ही राज्यात नव्हे ते केंद्रात करणार असल्याचा मिश्किल टोला आमदार शिवाजी कर्डिले यांनी लगावला आहे.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > सुजय विखे राज्यात आले तर आमचे मंत्रीपद अडचणीत येईल त्यांचे पुनर्वसन आम्ही राज्यात नव्हे ते केंद्रात करणार असल्याचा मिश्किल टोला आमदार शिवाजी कर्डिले यांनी लगावला आहे.
अहमदनगरमहाराष्ट्र

सुजय विखे राज्यात आले तर आमचे मंत्रीपद अडचणीत येईल त्यांचे पुनर्वसन आम्ही राज्यात नव्हे ते केंद्रात करणार असल्याचा मिश्किल टोला आमदार शिवाजी कर्डिले यांनी लगावला आहे.

Last updated: 2025/04/01 at 5:22 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

 अहिल्यानगर: अहिल्यानगर  येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे हे सध्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलत असताना. मी आता माजी खासदार असून व्यासपीठावर बसलेले सर्वच आजी आमदार आहेत. असे वारंवार सांगत असतात नगर तालुक्यातील अकोळनेर येथे धर्मबीज सोहळ्याच्या धर्मध्वज अनावरण सोहळ्याप्रसंगी सुद्धा खासदार सुजय विखे पाटील यांनी भाषणामध्ये उल्लेख करताना व्यासपीठावर असलेले दोन आजी आमदार आहेत. मात्र मी माजी खासदार असून मी फक्त बोलण्याचं काम करू शकतो असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले आहे कि लवकरच आम्ही खासदार सुजय विखे पाटील यांना आजी करण्याचं काम करणार आहोत. त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवणार आहोत. मात्र ते राज्यात येऊ नये असे आमची इच्छा आहे. कारण ते राज्यात आले तर आमचे मंत्रीपद अडचणीत येईल. असे होऊ नये म्हणून त्यांचे पुनर्वसन आम्ही राज्यात नव्हे ते केंद्रात करणार असल्याचा मिश्किल टोला आमदार  शिवाजी कर्डिले यांनी लगावला आहे.

सुजय विखे पाटील भाजपमध्ये दाखल, कुटुंबाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतल्याचा दावा - BBC News मराठी(संग्रहित दृश्य.)

सुजय विखे पाटील यांची राज्यात नव्हे तर केंद्रात वर्णी लागणार ?

गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अहिल्यानगर येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी भाजप आमदारांच्या सत्कार समारंभात आपल्या पुनर्वसनाची मागणी केली होती. नगर शहरात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नवंनिर्वाचित आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या सत्कार समारंभासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह महायुतीच्या दहा पैकी आठ आमदारांनी हजेरी लावली आहे. या सत्कार समारंभामध्ये माजी खासदार सुजय विखे यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे.  यानंतर आपल्या भाषणांमध्ये बोलताना खासदार सुजय विखे यांनी म्हंटलं की या मंचावर सर्वच आजी आहेत मी एकटाच माजी आहे तर माझ्याकडेही सर्वांनी लक्ष द्यावं, आणि माझं ही पुनर्वसन करावं असं म्हटलं होतं. सुजय विखे यांच्या विनंतीला प्रतिसाद देत सर्व आमदारांनी जिल्ह्यातील महायुतीच्या यशामध्ये सुजय विखेंचा सहभाग मोठा असल्याने तुमचं पुनर्वसन निश्चित होईल असं आश्वासन दिलं होतं. अशातच आता शिवाजी कर्डिले  यांनी सूचक वक्तव्य केल्याने सुजय विखे पाटील यांचे राज्यात नव्हे तर केंद्रात वर्णी लागते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink1
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यावरून वाद ; प्रियकराने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने प्रेयसीनेही केली आत्महत्या…
Next Article अनैतिक संबंधांतून महिलेच्या पतीने अन् मुलाने डोक्यात कत्ती आणि कोयत्याचे वार करत मुकादमाची निर्घृण हत्या….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?