TIMES OF NAGAR
नगर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन श्रीरामपूर शहरात करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार समारंभात नगरचे सुपुत्र ॲड. रोमान सय्यद (बी. एस. एल. , एल. एल. बी. , सी.सी. एफ. एम.जे.क्रिमिनल विधीज्ञ, वैद्यकीय कायदेशीर तज्ञ ) यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय ज्येष्ठ विधीज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या बद्दल ॲड. रोमान सय्यद यांचे शहरातून कौतुक करण्यात येत आहे.


