TIMES OF NAGAR
जम्मू कश्मीरच्या पहेलगाम येथे निष्पाप भारतीय हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करत मृत्यू तांडव घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांचे, पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर्स नगर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत जाळण्यात आले. मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी दिल्लीगेट परिसर दणाणून सोडले. हा हल्ला पाकिस्तानि षडयंत्र आहे. केंद्र सरकारने करारा जवाब देत पाकड्यांची मस्ती जिरवावी, अशी मागणी शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी शिवसैनिकांनी श्रद्धांजली देखील वाहिली. मृत्युमुखींना श्रद्धांजली वाहत पुष्पचक्र अर्पण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पादत्राणे काढली नव्हती. या गोष्टीचा देखील शिवसेनेने निषेध केला.
मंत्र्यांना कडेकोट संरक्षण, तसंच संरक्षण सामान्य भारतीयांना केव्हा मिळणार ?
शिवसेना शहर प्रमुख किरण काळे म्हणाले कि दहशतवाद्यांनी अगोदर रेकी करून पूर्वनियोजित कट आखून हल्ला घडवून आणला. धर्म विचारून हिंदू असल्याची खात्री करत निष्पापांचे बळी घेतले. ही राजकारण करण्याची वेळ नाही. मात्र मागील अकरा वर्षांपासून हिंदूंचेच सरकार असून देखील हिंदुस्थानातील ‘हिंदू खतरे मे आहे’ हे भयान वास्तव आहे.




