APP32-270223
ISLAMABAD: February 27 - Special Assistant to Prime Minister Atta Tarar addressing an important press conference. APP/TZD/FHA
SHARE
TIMES OF NAGAR
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. पूर्वानुभव लक्षात घेता भारत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता असल्याने पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली आहे. त्याला भारताकडून लष्करी हल्ल्याची भीती आहे. म्हणूनच मंगळवारी (दि.२९ ) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास पाकिस्तानचे माहितीमंत्री अत्तातुल्लाह तारार यांनी घेतली. भारत २४ ते ३६ तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करणार असल्याची विश्वासार्ह माहिती गुप्तचर विभागाकडून पाकिस्तानला मिळाली आहे. असा दावा या पत्रकार परिषदेत आत्तातुल्लाह तारार यांनी केला.आत्तातुल्लाह तरार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील व्हिडीओसह याबाबत पोस्ट केली आहे. पहलगाम घटनेत सहभाग असल्याच्या निराधार आणि खोट्या आरोपांच्या बहाण्याने भारत येत्या २४ ते ३६ तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहेत. अशी गुप्तचर विभागाकडे विश्वासार्ह माहिती आहे. तथपि अशा सहभागीचे आरोप पाकिस्तान स्पष्टपणे नाकारत असून कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाला निर्णायक प्रत्युत्तर देण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. खुद्द पाकिस्तान दहशतवादाचे लक्ष्य असल्याचे सांगत भारत आता स्वत:ला जजज्युरी आणि जल्लाद समजत असून ही एक धोकादायक आणि बेजबाबदार वृत्ती आहे. असे अत्तातुल्लाह तरार यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्याची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी न्यूट्रल एक्स्पर्ट कमिशन नेमण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने ठेवला होता. पण भारताने तो स्वीकारला नाही. तपास टाळण्यावरून भारताचा हेतू शुद्ध नसल्याचे सिद्ध होते. असा दावा करून केवळ राजकीय फायद्यासाठी जनतेच्या भावना भडकवून लष्करी निर्णय घेतले जात आहेत. असा आऱोप तारार यांनी केला. भारताने लष्करी कारवाई केली तर त्याची संपूर्ण जबाबदारी भारतावर असेल. पाकिस्तान अशा कोणत्याही आक्रमणाच्या कारवाईला पूर्ण आत्मविश्वासाने आणि दृढतेने प्रत्युत्तर देईल. देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहोत. अशी दर्पोक्तीही अत्तातुल्लाह तरार यांनी केली.