TIMES OF NAGAR
धाराशिव : मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजत आहे. फेब्रुवारी महिन्यात तुळजापूरमध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी सुरुवातीला तिघांना अटक केली. संबंधित तिघांची चौकशी केली असता या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील व्यापकता समोर आली होती. पोलिसांनी मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं. यात एक दोन नव्हे तर तब्बल ३६ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सोळा जणांना अटक केली आहे. अजून २० जण फरार आहेत. आता याच प्रकरणात आता बडा मासा गळाला लागला आहे. पोलिसांनी एका भाजपच्या नेत्याला अटक केली आहे. संबंधित नेता मागील दीड महिन्यांपासून फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. आता अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. शरद जमदाडे असं अटक केलेल्या भाजप नेत्याचं नाव आहे.