कास्टिंग काउचमुळे अनेक अभिनेत्रींना वाईट अनुभव आल्याचे पिडीत अभिनेत्रींनी सांगितले आहे. अनेक अभिनेत्रींनी याबाबत अगदी उघडपणे वक्तव्य देखील केली आहेत. कित्येक जणींनी तर थेट त्यांच्यासोबत घडलेले प्रसंग अगदी न घाबरता सांगितले आहेत. अशातच एका बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीला कास्टिंग काउचचा अनुभव आलाय. दिग्दर्शकानं तिच्याकडे ‘वन नाईट स्टँड’ची मागणी केली. पण, तिनं ती क्षणात धुडकावून लावली असल्याच तीन म्हंटल आहे. तिच्या याच नकारामुळे तिच्या हातून अनेक मोठे सिनेमे गेले असल्याचे तिने व्यक्त केले, एवढंच काय तर, तिला न्यूड फोटोशूटही करायला सांगितलं होतं. मात्र या भानगडीत न पडता तिने चांगल्या मार्गाने तिचे काम सुरु ठेवले. आणि इम्तियाज अलीच्या’रॉकस्टार’ चित्रपटातून डेब्यू केलेला. या अभिनेत्रीनं वरुण धवनपासून अक्षय कुमारपर्यंत सर्वांसोबत काम केलं. पण तिच्या कारकिर्दीत तिला कास्टिंग काउचचं दुःखही सहन करावं लागलं. दरम्यान, तिनं कॉम्प्रोमाइज न करण्याचा निर्णय घेतला आणि या संकटातून स्वतःला वाचवले.