मै झुकेगा नही साला…… म्हणत प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी पुष्पा – 2 या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या तो व्यस्त आहे. अल्लू हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. भारत भारत त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्याने आपल्या कृत्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अल्लू अर्जुनने दारू आणि तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला आहे.
10 कोटींच्या समोर झुका नही पुष्पा.
अल्लू अर्जुनला एका दारूच्या आणि तंबाखूच्या कंपनीने एका जाहिरातीसाठी विचारणा केली होती. या जाहिरातीसाठी अल्लू अर्जुनला 10 कोटी रुपये मिळणार होते. पण अल्लू अर्जुनला कोणताही वाईट संदेश द्यायचा नव्हता. त्यामुळे त्याने ही जाहिरात करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अल्लू अर्जुन ‘पुष्पा २: द रुल’मध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागासाठी त्याने ३५ कोटी रुपये घेतले होते, मात्र आता जाहिरातींसाठी तो दररोज ६ कोटी रुपये घेत आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुष्पा “BEST ACTOR”
चाहत्यांच्या मनावर आपल्यानावाचे ठसे उमटवणारा अल्लू अर्जुन याने एकोणसत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर देखील आपले नाव कोरले आहे. पुष्पा (द राइज पार्ट 1) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘पुष्पा’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली. पुष्पा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं. पुष्पा सिनेमाने कोटींचा गल्ला जमवला. अनेक रेकॉर्ड केले. मात्र या सिनेमाने असा कारनामा केला जे सिनेसृष्टीत गेल्या ७ दशकात कधीच होऊ शकलं नाही. अनेक तेलगू सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र आतापर्यंत एकाही तेलगू अभिनेत्याला हा पुरस्कार मिळवता आला नव्हता. आता पुष्पा सिनेमासाठी अल्लू अर्जुन याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जुनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अल्लू अर्जुनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय होता.
पुष्पाच्या सिनेमाच्या यशानंतर अल्लू अर्जुनची लोकप्रियता वाढली आहे. तो अनेक प्रसिद्ध ब्रँडचा चेहरा बनला आहे. यंदा या सिनेमातील त्याच्या अभिनयासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. अलीकडेच त्याने आणखी ६ नवीन ब्रँडशी करार केले आहेत. यामध्ये कोका-कोला, केएफसी, झोमॅटो आणि रेड बस यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा त्यात समावेश आहे.
किंग,सिंघम,खिलाडी तुमच्या घरी…! कोर्टाच्या नोटीसा तिघांच्या घरी….!
आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याच्या जाहिराती केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेते शाहरुख खान, अक्षय कुमार , आणि अजय देवगण यांना केंद्र सरकारने नोटिसा बजावल्या होत्या.अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या अवमानना याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वकिलांनी अभिनेत्यांना नोटिसा पाठवल्याची माहिती दिली.या प्रकरणावर सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू असल्याने अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर केलेली याचिका अवमानना याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारच्या वकिलांनी केली आहे.युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने ९ मे २०२४ रोजी सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने याआधी केंद्र सरकारला याचिकाकर्त्याच्या प्रतिनिधीत्वावर निर्णय घेण्यास सांगितलं होतं. ज्यांनी मुळात अभिनेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे असा युक्तिवाद केला होता. परंतु ते गुटखा कंपन्यांच्या जाहिराती करत होते. २२ ऑक्टोबरला सरकारला निवेदन देण्यात आले होते. पण पुढे यावर काहीही कारवाई झाली नसल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला. शुक्रवारी डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी उच्च न्यायालयात सांगितले की,”केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीच आपला करार रद्द केला असूनही त्याची जाहिरात दाखवणाऱ्या गुटखा कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती, असेही न्यायालयाला सांगण्यात आले”.
तिन्ही अभिनेते पद्मश्री.
२००५ साली पद्मश्री. : पद्म पुरस्कारांमध्ये हा सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्ननंतर हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील असाधारण आणि उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. पुरस्कारामध्ये १-३/१६ इंच आकारमानाचा कांस्य बॅज दिला जातो. किंग खान याला २००५ साली तत्कालीन राष्ट्रपती स्व.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्याला त्याच्या जीवनात अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्याला त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा हि मान मिळाला आहे.
२००९ साली पद्मश्री. : अक्षय कुमार याला २००९ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलयांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अक्षय कुमार हा एक बॉलीवुड मधील हिंदी चित्रपट अभिनेता आहेत. त्याचे खरे नाव राजीव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव हरिओम भाटिया तर आईचे नाव अरुणा भाटिया आहे. बॉलीवूडमध्ये येण्याआधी अक्षय थायलंडला मुये थाई शिकायला गेला होता. तिथे त्याने कूक म्हणून हॉटेलमध्ये काम सुद्धा केले.आपल्या अभिनयाच्या जोरावर अक्षयने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे.त्याला देखील त्याच्या जीवनात अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्याला त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा हि मान मिळाला आहे.
२०१६ साली पद्मश्री : अजय देवगणला २०१६ साली तात्काली राष्ट्रपती स्व.प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अजय देवगण याचे खरे नाव विशाल देवगन आहे पण त्याला अजय देवगण म्हणून ओळखले जाते. अजय देवगण एक भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. शंभरहून अधिक हिंदी चित्रपटांतून दिसणारा, हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वांत लोकप्रिय आणि प्रभावशाली अभिनेता म्हणून त्याचा व्यापकपणे विचार केला जातो.देवगणने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांसह असंख्य लोकांची मने जिंकली आहेत.