खून करून थांबले नाही तर ओळख पटू नये म्हणून ज्वलनशील पदार्थाने त्याला जाळले.
घारगाव हद्दीत फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता. अशा प्रकारे प्रेत आढळून आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मयत व्यक्ती गोरख दशरथ बर्डे (वय ४८, रा. मिरपुर, लोहारे, तालुका संगमनेर) याची ओळख पटू नये यासाठी आरोपी दिनेश शिवाजी पवार (रा.वडगाव कांदळी ता. जुन्नर) आणि विलास पवार (रा. पेमदरा, ता. जुन्नर जि. पुणे) यांनी गोरख दशरथ बर्डे (वय ४८, रा. मिरपुर, लोहारे, तालुका संगमनेर) याला माळवाडी येथे एका नातेवाईकाच्या लग्नात वरातीला बोलवून त्याचा खून केला व ओळख पटू नये म्हणून ज्वलनशील पदार्थ टाकून त्याचा चेहरा आणि शरीराचा काही भाग जाळला होता. यामुळे मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी मोठ्या शितापीने याचा छडा लावत दोन गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.


अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले असून पोलिसांनी मृताच्या जावयासह आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर जवळील घाटामध्ये १६ डिसेंबरला फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता. हा घातपाताचा प्रकारअसल्याचे लक्षात घेत पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यापासून खून करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. गोरख दशरथ बर्डे (वय ४८, रा. मिरपुर,लोहारे, तालुका संगमनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून दिनेश शिवाजी पवार (रा.वडगाव कांदळी ता. जुन्नर) आणि विलास पवार (रा. पेमदरा, ता. जुन्नर जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. यातील दिनेश पवार हा मृताचा जावई असून विलास पवार हा शेजारी राहणारा आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या पत्नीशी मयताचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांना होता. त्यावरून त्यांनी त्याला माळवाडी येथे एका नातेवाईकाच्या लग्नात वरातीला बोलवून त्याचा खून केला व ओळख पटू नये म्हणून ज्वलनशील पदार्थ टाकून त्याचा चेहरा आणि शरीराचा काही भाग जाळण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.