छत्रपतींच्या वंशजांना डावलून सर्वच अधिकारी पत्रिकेवर विराजमान !
श्रेय घेण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर ? महाराष्ट्राचे आराध्य दैवताच्या लोकार्पण सोहळ्याचा खेळ
मांडण्याचा डाव कोणाचा ?
अहमदनगर महानगर पालिकेच्या महापौर आणि नगरसेवकांचा कार्यकाळ या महिन्याच्या अखेरीस संपूष्टात येणार आहे. नगरसेवकांची मुदत संपणार आहे.नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर मेंबर,नेते,साहेब,या मानपानाला विसरून नगरसेवकांना एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून जगावे लागेल हे जगणे कदाचित कठीण असल्याचे काही राजकीय विश्लेषक सांगतात.अचानक भेटलेल्या वस्तूचा आनंद,आणि अचानक गेलेल्या खुर्चीचे नैराश्य भरून काढायला अनेक दिवस ओलांडले जातात असे ही ते खासगीत सांगतात.महानगर पालिकेच्या निवडणुका २०२५ मध्ये होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.हा मोठा कालखंड असल्याने साहेबांना आता एक वर्ष खुर्ची विरहित जगावे लागणार आहे.तर या एक वर्षभरात अनेक भावी नगरसेवक , नेते,भाऊ तयार होणार आहे.
अहमदनगर महानगरपालिका परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन (१९ फेब्रुवारी) २०२३ रोजी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले होते. या भूमिपूजनाला संभाजीराजेंची एंट्री झाली, स्टेजवर जाताच त्यांनी राजेशाही खुर्ची काढयला सांगितली. राजेशाही खुर्चीवर बसण्यास नकार दिल्याने संभाजीराजेंचा साधेपणा नगरकरांना भावला होता.
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिनी छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले होते. आमदार संग्राम जगताप व महापौर रोहिणी शेंडगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता.प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावरील आरूढ पुतळा बसवण्यासाठीच्या कामाचे भूमिपूजन भव्य दिव्य पद्धतीने करण्यात आले आहे.
एवढी गडबड श्रेय घेण्यासाठीच का.
अहमदनगर महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारत आवारात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती.शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज गुरुवार दिनांक २१ डिसेंबर २०२३ सायंकाळी. ४:३० वाजता संपन्न होणार आहे. या कार्यायक्रमाचे उद्घाटन महापौर रोहिणी शेंडगे,आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे,तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुजय विखे असणार आहे.या विशेष कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ,जिल्हा पोलीस अधीक्षक.राकेश ओला,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,म.न.पा आयुक्त पंकज जावळे,उपमहापौर गणेश भोसले,स्थायी समिती सभापती गणेश कवडे,सभागृह नेता,विरोधीपक्षनेते,सभापती म.बा.क.समिती,उपसभापती म.बा.क.समिती आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अहमदनगर शहरात घडणाऱ्या ऐतिहासिक क्षणाला एवढ्या गडबडीत आटपून घेण्याचे कारण काय असा सवाल सध्या नगरकरांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.छत्रपतींच्या कोणत्याही वंशजाला आमंत्रित न करता हा कार्यक्रम याच महिन्यात अटपण्याच्या तयारीला नगरकरांनी राजकारणाचे वळण दिले आहे.
१९ फेब्रुवारीला शिवजयंतीनितीम कार्यक्रम ठेवायला पहिजे होता – शिवप्रेमी
इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. फेब्रुवारी महिन्यातील १९ तारीख ही अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे १९ फेब्रुवारीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्यावर जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपतींच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करायला पाहिजे होता,एवढ्या चांगल्या दिवशी जर पालिका करू शकत नाही हे अहमदनगर महानगर पालिकेचे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन देखील शुभदिन
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर महानगर पालिकेमध्ये कार्यक्रमांचे आयोजन असतेच,फेब्रुवारी मध्ये जर आचार संहिता लागू झाली तर आपल्याला श्रेय भेटणार नाही या संतापातच कदाचित हे नेते असावेत. खरच छत्रपतींचा आदर या नेते मंडळींना असता तर या नेते मंडळींनी शिवजयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले असते.आणि १९ फेब्रुवारी पर्यंत जर पुतळ्याचे काम पूर्ण झाले नसते तर प्रजासत्ताक हा देखील अत्यंत सुभ दिवस आहे त्यावेळी देखील कार्यक्रमाचे नियोजन आखता आले असते.
ऐतिहासिक क्षणाला छत्रपतींच्या वारसांना आमंत्रण नाही.?
अहमदनगर महानगरपालिका परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन (१९ फेब्रुवारी) २०२३ संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले होते. या भूमिपूजनाला संभाजीराजेंची एंट्री झाली, स्टेजवर जाताच त्यांनी राजेशाही खुर्ची काढयला सांगितली. राजेशाही खुर्चीवर बसण्यास नकार दिल्याने संभाजीराजेंचा साधेपणा नगरकरांना भावला होता.मात्र आज अहमदनगर महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारत आवारात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती.शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज गुरुवार दिनांक २१ डिसेंबर २०२३ सायंकाळी. ४:३० वाजता संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही वंशजाला महापालिकेने आमंत्रण दिले नाही शहरातील व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या नावाची पत्रिका काल रात्री प्रसारित करण्यात आली.भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी राजे भोसले यांना आमंत्रित करण्यात आले होते पण या वेळेस त्यांना देखील लोकार्पण सोहळ्यापासून लांब ठेवण्यात आले आहे.ते जर कार्यक्रमाला आज हजर असते तर श्रेय घेण्यासाठी धडपड करणाऱ्या नेत्यांची गोची झाली असती.