बंड केल्यानंतर अजित पवारांचा मिशन विश्वास ?
राजकारणात जास्त स्पष्ट बोलून चालत नाही. कार्यकर्त्यांची मने जपावी लागतात.कार्यकर्त्यांना घेऊन त्यांची कामे मार्गी लाऊनच आपली खुर्ची वाचवता येते. हा बाळकडू प्रत्येक राजकारण्याला लहानपणीच मिळालेला असतो. शरद पवार देखील याला अपवाद नाही,अनेक मोठ्या राजकीय घडामोडींना कुदळत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर अनेकवेळा आपल्या नावाचा झेंडा गाडणारा तरुण त्याकाळी महाराष्ट्राला मिळाला.विचार करून बोलणे,अभ्यासपूर्वक बोलणे,संयम बाळगणे अशा अनेक गोष्टींनी शरद पवारांना एक मोठी ओळख दिली,कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करण्याची संधी दिली. राजकारणात आपल्या पाठोपाठ आपल्या भावी पिढीने देखील सक्रीय व्हावे अशी इच्छा बाळगणारे शरद पवार यांनी लेक सुप्रिया शरद पवार (सुळे) अजित अनंतराव पवार यांना राजकारणात आणून एक ओळख दिली.
सुप्रिया सुळेंची राजकीय सुरुवात :
सुप्रिया सुळे २००६ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. २००९ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढविली आणि ३.३६ लाख मतांनी विजय मिळविला.पुढे त्यांनी १० जून २०१२ रोजी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १२ व्या स्थापना दिवसानिमित्त,तरुण मुलींना राजकारणात येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबईत “राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस” सुरू केली. २०१४ आणि २०१९ मध्ये त्या महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर पुन्हा निवडून आल्या.
बाळासाहेब ठाकरे आणि सुप्रिया शरद पवार :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शहरात पवार यांनी आपल्या लोक माझा सांगाती या पुस्तकामध्ये म्हंटल आहे कि,बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया सुप्रिया सुळेंच्या राजकीय एन्ट्रीला पाठिंबा दर्शवला होता. याबद्दल शरद पवार लिहितात, बाळासाहेबांनी एखाद्याला एकदा आपलं मानलं, की बाकी सारं त्यांच्यासमोर फिजूल असायचं. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होतेच. माझ्यावर ते तुटून पडायचे. परंतु जेव्हा सुप्रियाला राज्यसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्याचा निर्णय झाला, तेव्हा बाळासाहेबांच्यातल्या उत्कट भावनाशील माणसाचं मला दर्शन झालं.
मी त्यांना सांगितलं, सुप्रिया राज्यसभेसाठी निवडणूक लढवते आहे. युतीतर्फे कोण उमेदवार असेल ? बाळासाहेब उत्तरले, शरदबाबू, असं विचारताना तुम्हाला काही वाटत कसं नाही ? सुप्रिया सहा महिन्यांची असल्यापासून माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहे. आज तिला संधी आल्यावर मी तिच्याविरोधात उमेदवार देईन, असं तुम्हाला कसं वाटलं ? मी प्रश्न केला, तुमचं ठीक आहे. पण भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेईल ? यावर त्यांचं उत्तर होतं, कमळाबाईला कसं पटवायचं, ती माझी जबाबदारी.
अजित पवारांची राजकीय एन्ट्री :
काका शरद पवार यांचे एवढ वाय वाढलय तरी देखील ते थांबत नाहीत,आम्हाला तरुण पिढीला संधी देत नाही.असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार घेऊन आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा ठोकून सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री होऊन काकाला झटका दिलेले अजित पवार अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत. कोणाचाही विचार न करता थेट बोलणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख आहे.अजित पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नेहमीच्या भेटीवरुन होत असलेल्या चर्चांना उत्तर दिलं.