ब्राझील मध्ये शरीर संबंध ठेवण्याची वयोमर्यादा १४ वर्ष आहे.
पोलिस सध्या भाचीसोबत झोपल्याच्या आरोपांचा तपास करत आहे.
पती १५ वर्षीय भाची सोबत झोपल्याच्या रागामध्ये एका महिलेने त्याचे गुप्तांग (Penis) कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ब्राझीलच्या Atibaia मधील असून तिच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा आरोप लावण्यात आला आहे. या महिलेने ३९ वर्षीय पतीला प्रेमाने बेडवर झोपवलं, नंतर त्याचे हात, पाय बांधले आणि रेझरने त्याच्यावर हल्ला केला.
il च्या रिपोर्ट्सनुसार, या महिलेने पतीच्या गुप्तांगासोबत फोटो काढला आणि नंतर ते टॉयलेट मध्ये फ्लश देखील केले. Daily Mail च्या वृत्तानुसार नंतर ही महिला पोलिस स्टेशन मध्ये पोहचली तिथे तिने पोलिसांनी केलेल्या कृत्याची कबुली देखील दिली. सध्या पती हॉस्पिटल मध्ये दाखल आहे पण त्याच्या प्रकृतीबद्दल मात्र माहिती मिळू शकलेली नाही. यावेळी तिने पोलिसांना ‘(शिश्न) पुन्हा लावता येऊ शकतं असं मी ऐकलं असल्याचं’ देखील म्हणाली आहे.