TIMES OF AHMEDNAGAR
तिला म्हणाला तु मला खूप आवडते, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे….

अहमदनगर जिल्ह्यात रोड रोमियोंची काही कमी नाही.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शहरातील रोड रोमियोंवर आळा घातला होता.मात्र काही काही ठकाणी शिक्षक देखील रंगीला रतन असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी सावेडी भागातील एका खासगी क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना घडली होती.तोफखाना पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज पुन्हा एका मजनूची एन्ट्री झालेली आहे.

रोड रोमियो मजनू.
शाळेत जाणाऱ्या मुलीची छेड काढली जाते. त्या भीतीपोटी अनेक मुलींनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला असल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. शाळेतून घरी जाणाच्या एका अल्पवयीन मुलीला एका मजनूने छेडल्याची घटना घडली आहे.मजनूने मुलीचा दुचाकीवरून पाठलाग करून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. छेड काढणाऱ्या युवका विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल संजय ढंगे (रा. टाकळी काझी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडिताने फिर्याद दिली आहे.


