TIMES OF AHMEDNAGAR
रामलल्लांच्या आगमनाबरोबरच आपल्या बाळाचाही जन्म व्हावा, अशी इच्छा या दाम्पत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
देशभर सध्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. एकीकडे राजकीय तर दुसरीकडे धार्मिक वातावरण आहे. २२ जानेवारीलाच आपल्या बाळाचा जन्म व्हावा यासाठी अनेक महिलांनी रुग्णालय प्रशासनाला अर्ज देखील केले आहेत. प्रकारामुळे अयोध्येतील रुग्णालय प्रशासन चक्रावले आहेत. २२ जानेवारी रोजी रामलल्लासोबतच आपल्या बाळाचाही जन्म व्हावा, यासाठी गर्भवती माता शस्त्रक्रियेसाठी (सिझेरियन प्रसूती) तयार असल्याचे अर्ज रुग्णालयांकडे येत आहेत.
२२ जानेवारीलाच आपल्या बाळाचा जन्म व्हावा !
ज्या महिलांची प्रसूती तारीख २२ जानेवारीच्या जवळपास आहे.अशा महिलांनी २२ जानेवारीलाच आपल्या बाळाचा जन्म व्हावा, अशी विनंती करणारे अर्ज रुग्णालयाकडे करायला सुरुवात केली आहे. रामलल्लांच्या आगमनाबरोबरच आपल्या बाळाचा जन्म व्हावा, अशी इच्छा या दाम्पत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यासही ही दाम्पत्य तयार असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात इंडिया टुडेनं कानपूर सरकारी रुग्णालयातील विभागप्रमुखांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्येतील प्रसूती रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येनं दाम्पत्यांचे अर्ज येऊ लागले आहेत. रुग्णालयाच्या लेबर रूममध्ये आम्हाला रोज १४-१५ दाम्पत्यांकडून २२ जानेवारीलाच डिलिव्हरी व्हावी, असे अर्ज येत आहेत. अशा स्थितीत सामान्य पद्धतीने प्रसूती होणं निव्वळ अशक्य आहे. आम्ही त्यांना यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल, हे समजावून सांगितलं आहे. रुग्णालयाने आत्तापर्यंत २२ जानेवारी रोजी ३५ शस्त्रक्रियांचं नियोजन केलं आहे. आम्ही एरवी दिवसाला फक्त १४ ते १५ शस्त्रक्रिया करतो अशी माहिती विभागप्रमुख डॉ. सीमा द्विवेदी यांनी दिली आहे.
हे फार विचित्र आहे
हे फार विचित्र आहे. अनेकदा आम्हाला पालकांकडून अशा प्रकारच्या विनंती करण्यात येतात. काही पालक त्यांना कुणीतरी सांगितलेल्या मुहूर्तावरच बाळाचा जन्म व्हावा यासाठी मागे लागतात. अशा वेळी मुदतपूर्व प्रसूतीमधून निर्माण होणाऱ्या अडचणींकडेही दुर्लक्ष करण्याची त्यांची तयारी असते.असं डॉ. सीमा द्विवेदी यांनी पीटीआयशी बोलताना यावर सविस्तर भूमिका मांडली आहे.