TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर : शहराच्या राजकारणाची पातळी वारंवार घसरत चालली आहे. खालच्या पातळीवरील टीका ते एकेरी उल्लेखाचे हे राजकारण शहराच्या विकासाच्या संकल्पनेला वेगळे वळण देत आहे.काही दिवसांपूर्वी हिंद सेवा मंडळाकडे भाडेपट्ट्याने असलेली जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत आरोप कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला होता. यात हिंद सेवा मंडळाचे काही संचालक दलाली करत आहेत असाही आरोप संचालकांवर झाला होता.

हिंद सेवा मंडळाची भूमिका काय ?
हिंद सेवा मंडळाच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत संचालक मंडळाने सांगितले कि हे सगळे आरोप चुकीचे असून या जागेवरील ताबा सोडण्यासाठी संस्थेकडे प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्या प्रस्तावापोती जागा मालक संस्थेला २५ कोटी रुपयांपर्यंत मदत देणार आहेत. प्रस्तावावर सर्वसाधारण सभेत सदस्य निर्णय घेतील. संस्थेच्या हिताचा प्रस्ताव असल्याने तो आम्ही मांडला आहे. मात्र, केवळ माजी आमदार अरुण जगताप यांचे नाव यात आल्याने राजकीय दृष्टीकोनातून आरोप होत असल्याचा खुलासा हिंद सेवा मंडळाने आता केला आहे.

माजी.आमदार अरुण जगताप यांचे नाव असल्याने बिनबुडाचे आरोप !
विधान परिषदेचे माजी.आमदार अरुण जगताप यांचे चिरंजीव संग्राम जगताप हे शहराचे विद्यमान आमदार आहेत. नगरकरांच्या प्रश्नांसाठी व विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या जगताप कुटुंबियांच्या शहराला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ नये याकरिता विरोधकांकडून जगताप कुटुंबावर बिनबुडाचे आरोप राजकीय नेते करता असल्याचे नागरिक सध्या चर्चा करत आहे.
किरण काळे कोण हे आम्हाला माहिती नाही. त्यांनी चुकीचे आरोप करू नयेत, अशी विनंती आहे. अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, विश्वस्त अनंत फडणीस यांनी जागेच्या आरोपांबाबत भूमिका पत्रकार परिषदेत माडली.

जागेच प्रकरण काय ?
सारडा महाविद्यालयाजवळ संस्थेकडे सुमारे अडीच एकर जागा भाड्याने आहे. ती जागा तकिया ट्रस्टकडू भाड्याने घेतली गेली होती. त्यांनी १९९५-९६ मध्येच ती लुनिया – मुनोत कंपनीला विकलेली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार जागेचा कायदेशीर ताबा आजही संस्थेकडेच आहे. लुनिया मुनोत यांनी जागा कुणाला विकायची, हा त्यांचा प्रश्न आहे असे पत्रकार परिषदेत मंडळांनी सांगितले.


