TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका भागातील खांडके या गावात एका मोलमजुरी करणाऱ्या तरुणावर गावातील काही हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. तरुणार हल्ला करून जखमी केल्याने त्या तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आकाश ठोंबे असल्याचे समजते.


काय घडल.
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांडके या गावात काही गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून दहशत माजवण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून होत आहे. गावातील बरेचशे नागरिक काही टोळ्यांनी माजवलेल्या दहशतीला वैतागून गावातून पळ काढत असल्याचे समजते. काल शुक्रवार (दी.१९ जानेवारी) रात्री ९ वाजताच्या सुमारास आकाश ठोंबे या मजुरी करणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. आकाश ठोंबे हा तरुण त्याच्या मालकीचे शेतातून घराकडे जात होता. काही किरकोळ कारणावरून गावातील काही लोकांनी आकाश ठोंबे या तरुणाला शिवीगाळ केली. नवीन झालेल्या रोड वरून आकाश घरी जात होता. नवीन रस्त्यावरून तू कसा काय जातोस असा सवाल करत हल्लेखोरांनी आकाश याला जातीवाचक शिवीगाळ केली. वाद म्हणून आकाश यांनी माफी मागून पुढे जाने पसंत केले. मात्र हल्लेखोरांनी आकाशचा पाठलाग करून आकाशला चर्च जवळ आडवून बेदम मारहाण केली.


