TIMES OF AHMEDNAGAR
शरीर संबंधास नकार दिल्याने हत्या.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एकलासपूर शेत शिवारातील एका विहिरीत महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिलेने शरीर संबंधास नकार दिल्याने तिच्या डोक्यात दगड घालून महिलेची हत्या केली. तिचा मृतदेह विहिरीत टाकल्याचं समोर आलं आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनेचा उलगडा करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत होते. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय.
शेतात भेटले.
एकलासपूर शेतशिवारातील चंदू गावंडे यांच्या शेतातील विहिरीत ३१ जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यात मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी आरोपी आकाशाला ताब्यात घेतले. आकाशने ती महिला तालुक्यातील खेडपिंपरी येथील असल्याचं सांगितले. चौकशीत आकाशने तिच्या खुनाची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी तीन महिन्यांपासून मृत महिलेसोबत फोनवर संपर्कात होता. तो दररोज तिच्यासोबत फोनवर, व्हॉटसअप, व्हिडीओ कॉलवर बोलत होता. २५ जानेवारी रोजी ती महिला नांदगांव खंडेश्वर येथे आली होती. त्यादिवशी दोघेही संध्याकाळी आकाशच्या एकलासपूर शिवारातील शेतात भेटले होते.पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, डोक्यावर मार असल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं उघड झालं होतं. २ फेब्रुवारी रोजी खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत होते. ५ फेब्रुवारी एलसीबीने आकाश मंदुरकर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली.
अंगावरील साडी,पेटीकोट काढला….
आकाशने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिच्याकडे आग्रह धरला. त्यामुळे दोघांत वाद झाला. तिने ही बाब आकाशच्या घरी सांगण्याची व गावात बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे आकाशने शेतातील दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. यातच तिचा मृत्यू झाला. ती मरण पावल्याची खात्री झाल्यावर आकाशने तिच्या अंगावरील साडी, पेटीकोट, स्टोल व चपला काढल्या. तिचा मृतदेह उचलून तो चंदू गावंडे यांच्या शेतातील विहिरीत टाकला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोणताही सुगावा नसताना मयताची ओळख पटविली. गुन्हा उघडकीस आणला आहे.