TIMES OF AHMEDNAGAR
नगर मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीला सकाळी आठ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे. याठिकाणी लागलेल्या आगीत चंदूकाका ज्वेलर्स आणि जवळ असलेल्या एका इमारतीला आग लागली असून ही आग रौद्र स्वरूपाची आहे आग विजवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी ठिकाणी दाखल झाले असून युद्ध पातळीवर आग विधानाचे प्रयत्न सुरू आहेत ॲम्बुलन्स आणि काही डॉक्टरची टीम सुद्धा या ठिकाणी तातडीने पोचली आहे.

महानगर पालिका जबाबदार – जगताप संतापले.
नगर मनमाड रोड वर असलेल्या साईमिडास या इमारतीला सकाळी आठ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या इमारतीची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना जगताप यांनी अधिकाऱ्यांची पोलखोल केली. फायरऑडिट करतांना अहमदनगर महानगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे आर्थिक तडजोड करत असल्याचा गंभीर आरोप जगताप यांनी केला आहे.शहरातल्या प्रत्येक इमारतीचे फायरऑडिट हे वेळेवर झाले पाहिजे. सुदैवाने आग लागलेल्या इमारतीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागू नये यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. कामचोर अधिकाऱ्यांच्या संदर्भात अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याचे संकेत देखील यावेळी जगताप यांनी दिले. शहरातील प्रतेक इमारतीचे फायर ओडीत होणे गरजेचे असल्याचे आमदार जगताप यांनी मत व्यक्त केले आहे.


