TIMES OF AHMEDNAGAR
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल दिला होता. त्यानंतर शरद पवार गटाला कोणतं नाव आणि चिन्ह मिळणार ? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यातील एका नावावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलाआहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच राज्यसभा निवडणुका पार पडेपर्यंत हे नाव वैध असेल असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शरद पवार यांच्या या नावाला मंजुरी !
नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार व नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – एस असे तीन पर्याय आयोगाला सुचवण्यात आले होते. त्यातील नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हा पर्याय निवडणूक आयोगानं मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक पार पडेपर्यंत शरद पवार गट हा नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या नावाने ओळखला जाणार आहे. शरद पवार गटाकडून सादर करण्यात आलेल्या तीन पर्यायांपैकी एक पर्याय निवडणूक आयोगानं मंजूर केला आहे.