By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: त्रास देणाऱ्या पोलिसांची तक्रार करता येणार, राज्य पोलीस महासंचालकांचे पत्र व्हायरल. कुठे आणि कशी करायची तक्रार पहा….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > त्रास देणाऱ्या पोलिसांची तक्रार करता येणार, राज्य पोलीस महासंचालकांचे पत्र व्हायरल. कुठे आणि कशी करायची तक्रार पहा….
महाराष्ट्र

त्रास देणाऱ्या पोलिसांची तक्रार करता येणार, राज्य पोलीस महासंचालकांचे पत्र व्हायरल. कुठे आणि कशी करायची तक्रार पहा….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MAHARASHTRA POLICE | STATE DIRECTOR GENERAL OF POLICE | RASHMI SHUKLA | INSTRUCTIONS FOR REPORTING TO THE POLICE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/02/10 at 12:32 PM
By BHAIYYASAHEB BOXER 5 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

रश्मी शुक्ला यांची काही दिवासंपूर्वी महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. शुक्ला यांनी पदभार स्विकारून एक महिना झाला असून या निमित्ताने त्यांनी एक पत्र लिहले आहे ते पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहले असून या पत्राची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

पत्राच्या सुरुवातीला त्यांनी सर्वांना शुभेच्छा देत एका महिन्यात आलेले अनुभव आणि पुढील वाटचाल शेअर करत असल्याचे सांगितले. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षा देणे हे आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भूतकाळातील चूका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Rashmi Shukla

कोण आहेत रश्मी शुक्ला ?

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शुक्ला यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध मुंबई व पुण्यात दाखल गुन्हे रद्द केले. तसेच सीबीआयने देखील गुन्ह्याचा तपास बंद करण्याची परवानगी मागितली आणि ती मान्य देखील झाली.

१९८८ च्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या पुण्यात आयुक्त आणि राज्याच्या गुप्तचर आयुक्त म्हणून कार्यरत असताना राजकीय नेत्यांचे टॅप केल्याप्रकरणी अडचणीत आल्या होत्या. शुल्का यांनी बेकायदेशील फोन टॅपिंग केल्याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या काळात त्यांना अटक होण्याची शक्यता होती. पण केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्याने त्या बचावल्या होत्या. 

 

राज्य पोलीस महासंचालकांच्या पत्रात काय ? 

 

प्रिय नागरिकांनो,
मी राज्य पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारून एक महिना झाला आहे. हे औचित्य साधत राज्याच्या सर्व पोलिसांच्या वतीने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि या अल्प कालावधीत मिळालेली शिकवण आणि पुढील वाटचालीच्या दृष्टीने माझे ध्येय तुमच्यासोबत शेअर करते.

महाराष्ट्र पोलीस दलातील समर्पित स्त्री-पुरुषांच्या बरोबरीने पुन्हा एकदा सेवा आणि संरक्षण करण्याच्या या विशेषाधिकाराबद्दल मी आधीच आभार व्यक्त करते. मी आतापर्यंत जे पाहिले आहे, अनुभवले आहे त्यावरून मला खात्री आहे की महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तटावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून, तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहतील.

केंद्रीय पोलीस दलाचे नेतृत्व करताना मिळालेल्या अनमोल अनुभव गाठीशी घेऊन मी राज्यात परतले आहे. राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक आणि उच्च दर्जाच्या वागणुकीचे पालन करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. आम्ही पोलीस आणि जनता यांच्यातील पूल पुन्हा बाधू पोलीस दलातील कोणत्याही सदस्याकडून हिंसा, शोषण किंवा गैरवर्तनाची कोणतीही अन्यायकारक कृत्ये आमच्याकडून खपवून घेतली जाणार नाहीत. जर राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्रास होत असेल आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना न्याय मिळू शकत नसेल, तर ही गोष्ट पोलीस महासंचालक कार्यालयात आमच्या निदेर्शनास आणून देण्याची मी विनंती करते. माझे सहकारी आणि मी तुम्हाला लवकरात लवकर मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू.

आमचे पोलीस दल सुरक्षितता आणि परिणामकारकतेने त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी आवश्यक संसाधने आणि प्रशिक्षणाने सुसज्ज आहेत याची खात्री करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. डीजीपी या नात्याने, आमच्या सेवेत दररोज आपला जीव धोक्यात घालणाऱ्या धाडसी पोलिसांना मी सर्वतोपरी पाठिंबा देईन.

आपल्यासमोर अनेक निरनिराळी आव्हाने आहेत आणि आपल्याला निश्चितच काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. पण मी तुम्हाला खात्री देते की माझ्या कार्यकाळात, महाराष्ट्र पोलीस या आव्हानांना न डगमगता किंवा पक्षपातीपणा न ठेवता सामोरे जातील. या कार्यात आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही. या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला तुमचे सहकार्य आवश्यक आहे. येत्या कालावधीत तुमच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी तुमच्याशी थेट संपर्क साधण्यास उत्सुक आहे. तोपर्यंत आपण मला पाठिंबा द्यावा ही माझी नम्र विनंती, कारण आपण सर्व एकत्रितपणे या नवीन अध्यायाला सुरुवात करत आहोत. जिथे प्रत्येकजण निर्भयपणे जगू शकेल, काम करू शकेल आणि भरभराट करू शकेल, असा महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही अविरत कार्य करू.

जय हिंद! जय महाराष्ट्र
आपले विनम्र,
रश्मी शुक्ला, भा.पो.से
महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक,महाराष्ट्र.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad1
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article गृहमंत्री देवेंद्र फडणविसांनी माझा गेम करण्याचे आदेश दिले होते. त्या आमदाराच्या वक्तव्याने महाराष्ट्रात खळबळ. आमदार म्हणाले …..
Next Article शहरात नवीन कलेक्टर नेत्यांची पावर …..?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?