TIMES OF AHMEDNAGAR
भाग -०३
अहमदनगर – गुंडांच्या दहशतीने शहराचा श्वास गुदमरून गेला आहे. प्राणघातक हल्ल्यांनी शहराच्या मातीला लाल केले आहे.शहरातली गुंडगिरी व दहशत पाहता अनेकांनी शहरातून काढता पाय घेतला आहे. तरुणांनी आपल्या शिक्षणाची व नोकरीची गाडी हि पुणे , मुंबई सारख्या शहरांच्या दिशेने वळवली आहे. गुंडांची दहशत असतांना सर्वसामान्य जनतेला मात्र पोलिसांकडून अपेक्षा आहे. मात्र काही पोलिसांच्या दादागिरीने सर्वसामान्यांच्या अपेक्षेचा भंग केला आहे.
पोलिसांकडून काय अपेक्षा ठेवणार ?
शहरातील एका तरुणाला मारहाण झाली होती. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी मनसेचे कार्यकर्ते कोतवाली पोलीस ठाण्यात गेले होते.पोलिसांकडून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कार्यकर्त्याला पोलिसाने चांगलाच प्रसाद दिला. पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी मनसे आक्रमक झाली आणि मनसेने त्या पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार थेट पोलीस अधीक्षकांकडे केली.मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर ताबडतोब कारवाई करा अन्यथा आम्ही उपोषण करणार असल्याचा इशारा मनसेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिला आहे.संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले होते. पोलिसच दादागिरी करत असतील तर पोलिसांकडून काय अपेक्षा ठेवावी अशी खंत मनसेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
स्त्रोत.सोशल मिडिया.
तानाशाही साम्राज्य ?
कोतवाली पोलीस ठाण्यात मारहाण करणारे पोलीस कर्मचारी भिंगार येथे नोकरीला असतांना वाळूंज बायपास येथे अनधिकृत काम करत असल्याची माहिती वरिष्ठाना मिळाल्याने त्या कर्मचाऱ्याला भिंगार पोलीस ठाण्यातून हटवून ताबडतोब मुख्यालयात हजर करून घेण्यात आले. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बाळ बोठे याच्या शिफारशीने त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करून घेण्यात आले अशी चर्चा सध्या कोतवाली पोलिसांमध्ये रंगली आहे. बोठेंच्या आशीर्वादाने कोतवाली पोलीस ठाण्यात साम्राज्य निर्माण केलेल्या त्या कर्मचाऱ्याने आपली प्रामाणिकता बोठेंच्या पक्षात कायम ठेवली. रेखा जरे हत्याकांडात अनेकांची नावे आली. मात्र हत्याकांडात काही पोलिसांचा सहभाग असल्याचे समजताच तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्या पोलिसांच्या नावावर पडदा टाकला. मात्र त्या पोलिसांची चौकशी सुरु केली. काही पोलिसांचे फोन देखील जप्त करण्यात आले होते.जरेंच्या हत्याकांडात पोलिसांची भूमिका आहे या बातम्या प्रसारित झाल्याने पोलीस खात्याची बदनामी वाचवण्यासाठी तत्कालीन अध्यक्षांनी पोलिसांच्या भूमिकेला प्रसारित होण्यापासून रोखले होते.


