By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आंधारे बरसल्या, फडणवीस एकेकाळी गोपीनाथ मुंडेंची बॅग घेऊन फिरायचे…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आंधारे बरसल्या, फडणवीस एकेकाळी गोपीनाथ मुंडेंची बॅग घेऊन फिरायचे…..
महाराष्ट्र

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आंधारे बरसल्या, फडणवीस एकेकाळी गोपीनाथ मुंडेंची बॅग घेऊन फिरायचे…..

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | HOME MINISTER DEVENDRA FADNAVIS | VIDHAN SABHA SPEAKER RAHUL NARVEKAR | SHIV SENA UDDHAV BALASAHEB THACKERAY GROUP | SUSHMA ANDHARE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/03/01 at 7:11 PM
By BHAIYYASAHEB BOXER 5 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

ठाणे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. योगायोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे राहतात असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा ठाण्यात पोहचली. त्यावेळी अंधारे यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच आपल्या भाषणात सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल  नार्वेकर यांच्यावरही टीका केली.

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची थेट गृहमंत्रीपदाची मागणी, काय आहे प्रकरण? - Marathi News | Devendra Fadnavis fails to manage Homeministee department sushma andhare slams maharashtra dcm | TV9 Marathi
स्त्रोत.सोशल मिडिया 

मला कशाला माकडांची भीती वाटेल ?

फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात  गुन्हेगारी वाढली आहे. सगळ्यात जास्त गुन्हेगारी हि ठाणे आणि कल्याण मध्ये आहे. मी हा आरोप माझ्या मनाने करत नाही. मला हे विविध जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या वकिलांनी सांगितलं आहे. हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. त्यादिवशी माझ्या सभेत माकड आलं त्याची बातमीही झाल्याचं मी वाचलं. मला कुणीतरी विचारलं माकडांची भीती वाटते का? मी त्यांना म्हटलं माकडचाळे करणारे लोक आजूबाजूला असताना मला कशाला माकडांची भीती वाटेल? असं म्हणत सुषमा अंधारे यांनी ठाण्यात टोलेबाजी केली.

MLA Disqualification: Sushma Andhare raised questions on Rahul Narvekar's advocacy; Criticism on Shinde too rrpस्त्रोत.सोशल मिडिया 

१० पक्ष फिरून आलेल्या माणसाने आम्हाला निष्ठेचं प्रमाणपत्र वाटण्याची गरज नाही

सध्या श्रीरामाचा फार बोलबाला आहे. मात्र श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. जे श्रीरामांचं राजकीय वापर करु पाहात आहेत त्यांना राम कळलेले नाहीत. त्यांना राम कळले असते तर मर्यादेचा गुण त्यांना कळला असता. भाजपा आणि शिंदेंच्या भक्तुल्यांनी मर्यादा नावाची गोष्टच ठेवलेली नाही. सगळ्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या आहेत. दिलेला शब्द हे लोक अजिबात पाळत नाहीत हे रोज स्पष्ट होतं आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी मोदींची नक्कल देखील केली. या लोकांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना पक्षात घेतलं आहे. प्रभू रामाचे खरे अनुयायी उद्धव ठाकरे आहेत. इतक्या गोष्टी घडून गेल्या तरीही त्यांनी मर्यादा सोडलेली नाही. त्यांचा राज्यकारभार व्हाया गुवाहाटी आणि सुरत यांनी हिरावून घेतला. मुख्यमंत्री शिंदेनी हे सभागृहात आणि अमृता फडणवीस यांनी बाहेर हे सांगितलं आहे. तसेच राहुल नार्वेकर यांच्यासारख्या १० पक्ष फिरून आलेल्या माणसाने आम्हाला निष्ठेचं प्रमाणपत्र वाटण्याची गरज नाही हे लोकांना आम्ही सांगितलं आहे. लोकही सध्या निवडणुकीची वाट बघत आहेत असंही अंधारे यांनी म्हटलं आहे. आपल्या भाषणात राजन विचारे यांचा उच्चार २०२४ ते २०२९ चे खासदार असा केला आहे. निष्ठेने काम करणं हेच इथे असलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात आहे. निष्ठेने वागणाऱ्या प्रत्येकाने आमची यात्रा यशस्वी केली.

Gopinath Munde's gone, but factionalism lives onस्त्रोत.सोशल मिडिया 

फडणवीस मुंडेंची बॅग घेऊन फिरायचे …

फडणवीस यांनी मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी लावण्यापेक्षा अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केलं जात होतं त्या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावली पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसंच मराठा आणि ओबीसी अशी भांडणं लावू नका. समृद्धी महामार्गावर आजवर हजारो जीव गेले त्याला जबाबदार कोण,त्याचीही एसआयटी चौकशी लावा. कालपर्यंत भाजपाने हिंदू-मुस्लीम दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. यांच्याकडे सगळे भक्त आहेत. नेते यांनी केव्हाच संपवले. ज्या मुंडेंची बॅग घेऊन फडणवीस फिरायचे त्या मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवण्याचं काम  फडणवीस यांनी केलं आहे. तुम्ही ओबीसींचेही नाहीत हे आम्हाला कळलं आहे. तसं असतं तर विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांचं राजकारण तुम्ही संपवलं नसतं. कधी काळी तुमच्या गळ्यातला ताईत असलेल्या आशिष शेलारांना साईडलाईन केलं नसतं. तुमच्या लाडक्या गँगमध्ये प्रसाद लाड आणि नवीन लोकांची भरती तुम्ही केली आहे. असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

आज भी एकनाथ शिंदे रखे हैं टैम्पो, पिस्टल और रिवॉल्वर भी नए CM के पास, कुल इतनी संपत्ति! - Eknath Shinde have rs 11 crore assets property networth car collection tempo owner
स्त्रोत.सोशल मिडिया

खोटी शपथ घेणारे मुख्यमंत्री आहेत…

हिंदू आणि मुस्लीम अशी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. मला आनंद वाटतो की मुस्लीम बांधवांनी दंगल घडू दिली नाही. भाजपाला जेव्हा हे समजलं की हिंदू-मुस्लीम दंगल होऊ शकत नाही तेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा डाव रचला गेला. सगळे गुण्यागोविंदाने नांदत होते, मात्र यांच्यात फूट पाडण्यात आली. एकीकडे खोटी शपथ घेणारे मुख्यमंत्री आहेत. शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्ही अधिसूचना मनोज जरांगेंच्या हाती देता, दुसरीकडे भुजबळ आणि पडळकर इशारे देतात. हे सगळे एकाच सरकारमध्ये आहेत पण परस्परविरोधी विधानं करुन नुरा कुस्ती करत होते. त्यामुळे हा वाद वाढला असाही आरोप सुषमा अंधारे यांनी केला.म्हणूनच हे लोक रामाचा वापर राजकीय टूलकिट म्हणून करत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची एसआयटी लावत आहात, फडणवीस यामागे तुम्ही शरद पवार आणि राजेश टोपे यांना लक्ष्य करत आहेत.  तुमचा खरा निशाणा मुख्यमंत्री शिंदेंवर आहे हे आम्हाला माहीत आहे असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अवैध धंद्यांच्या मलाईवर जोर , कोण आहे किच्चोर …. ?
Next Article तडप-तडप के इस दिल से आह निकलने लगी, एका स्पर्धकाने हेच गाणं गायलं आणि ऐश्वर्यासाठी सलमानच्या डोळ्यातून पाणी आलं……?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?