TIMES OF AHMEDNAGAR
राज्य शासनाने औरंगाबादचे नामकरण करून छत्रपती संभाजी नगर असे नवीन नाव दिले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील नाव धाराशिव असे नामकरण करण्यात आले होते. अशातच आता अहमदनगरच्या नामकरणासंदर्भात शासन निर्णय घेणार आहे. अहमदनगरचे नाव बदलून आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नवीन नामकरण करण्यात येणार आहे. अहमदनगर महापालिकेने या संदर्भातील एक ठराव देखील मंजूर केला आहे.
स्त्रोत. सोशल मिडिया.
मागच्या वर्षी मे महिन्यात चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जिल्ह्याच्या नामाकरणाबाबत घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अहमदनगर जिल्ह्याचे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” असे नामकरण केले जाईल अशी घोषणा केली होती.त्यानुसार आता नामकरणाची पुढील कारवाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेसह रेल्वे प्रशासन आणि पोस्ट ऑफिस यांचेही ना हरकत प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाच्या नगर विकासखात्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
स्त्रोत. सोशल मिडिया.
आता अहमदनगर नाही तर “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर”
आता याबाबत अहमदनगर महानगर महापालिकेत प्रशासकांच्या उपस्थित ठराव मंजूर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेकडे अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” केले असल्याचा बहुमताचा ठराव मागणी करण्यात आला होता. यानुसार जिल्ह्याचे नाव बदलण्याचा ठराव महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” करण्याबाबतचा हा ठराव नुकताच मंजूर करण्यात आला आहे. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून या नामांतर प्रस्तावाला अर्थातच ठरावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.